शिवज्योती मोहीम ३० ऑगस्टला कोल्हापूरात

शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेला ३५५ वर्षे पूर्ण होण्याच्या निमीत्ताने आग्रा ते राजगड ते पारगड अशी ही मोहीम होत आहे
shivaji maharaj
shivaji maharajsakal
Updated on

कोल्हापूर : 'आग्रा ते राजगड ते पारगड' शिवज्योतीचे ३० ऑगस्टला ताराराणी चौक (tararani chowk) येथे दुपारी चार वाजता आगमन होणार असून, शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील व विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. पाटील म्हणाले, "औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. या नजर कैदेतून शिवाजी महाराज चाणाक्ष बुद्धीने निसटून राजगड येथे सुखरूप पोचले. या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रेरणादायी घटनेचे स्मरण व्हावे, या उद्देशाने ही मोहीम होत आहे. आग्रा येथून १७ ऑगस्टला शिवज्योतीस सुरुवात झाली आहे.

चार राज्ये व ५८ शहरांतून बाराशे किलोमीटर अंतर मोहिमेद्वारे पूर्ण केले जाणार आहे. त्यात तीस जणांचा समावेश आहे. शिवाजी महाराज यांचे पायदळप्रमुख पिलाजीराव गोळे यांचे वंशज अॅड. मारुती गोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विविध भागांत मोहीमवीर शिवज्योत घेऊन धावत आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील हिल रायडर्स अॅडव्हेंचरचे शिलेदार व शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या अध्यक्ष सूरज ढोली सहभागी झाले आहेत."

shivaji maharaj
राणे विरुद्ध शिवसेना; रमेश मोरेची हत्या का झाली?

श्री. देवणे म्हणाले, "शिवज्योत २९ ऑगस्टला राजगडावर पोचणार आहेे. तेथून ती ३० ऑगस्टला कोल्हापुरात पोचेल. राजगड, सातारा, कराड, पेठ नाका, इस्लामपूर, पुलाची शिरोलीमार्गे ती कोल्हापुरात येईल. कावळा नाका, व्हिनस कार्नर, दसरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात येईल.

shivaji maharaj
'आपल्याच वहिनीवरती ॲसिड फेकण्यास कोणी सांगितलं?'

यानंतर ३१ ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे पाच नद्यांच्या पाण्याच्या कलशासह जिल्ह्यातील विविध तालुके, गडकोट व ऐतिहासिक ठिकाणांना ज्योती रवाना होतील. मुख्य शिवज्योत कागल, निढोरी, मुरगूड, गारगोटी, भुदरगड किल्ला, उत्तूर, गडहिंग्लज, सामानगड, नेसरीखिंड, गंधर्वगड, चंदगड, कलानिधीगडमार्गे पारगडला पोचणार आहे. सलग दोन दिवस योद्धा कमांडो रेस्क्युचे कमांडो शिव ज्योतीबरोबर संचलन करणार आहेत." पत्रकार परिषदेस आर. एस. पाटील, ऋषिकेश केसकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.