Kolhapur : ठरले जिल्ह्याच्या विकासाचे धोरण;पर्यटनासाठी करार, शाश्‍वत परिषदेत प्रमुख क्षेत्रांवर विचारमंथन

उद्योग, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योग यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करण्याची घोषणा आज मित्र संस्थेच्या शाश्‍वत विकास परिषदेत करण्यात आली. साहसी पर्यटन स्थळ म्हणून कोल्हापूरच्या प्रचारासाठी पर्यटन संचालनालयाने ‘’व्हर्टिस’’ (साहसी पर्यटन ऑपरेटर) सोबत सामंजस्य करार केला.
Kolhapur
Kolhapur sakal
Updated on

कोल्हापूर : उद्योग, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योग यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करण्याची घोषणा आज मित्र संस्थेच्या शाश्‍वत विकास परिषदेत करण्यात आली. साहसी पर्यटन स्थळ म्हणून कोल्हापूरच्या प्रचारासाठी पर्यटन संचालनालयाने ‘’व्हर्टिस’’ (साहसी पर्यटन ऑपरेटर) सोबत सामंजस्य करार केला. तसेच ग्रामीण ‘होम स्टे’ आणि पर्यटन विकासासाठी ‘’क्रिडाई’’ आणि पर्यटन संचालनालयाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. २०२८ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) तीन लाख कोटी साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील १८.१ टक्के ‘सीएजीआर’ (चक्रवाढ वार्षिक वाढ दर)साध्य करण्यासाठी शिफारसी देण्यात आल्या.

फाउंड्री आणि अभियांत्रिकी क्षेत्र

  • ईव्ही घटक, एरोस्पेस, आणि संरक्षण यामध्ये उपक्रम हाती घेणे

  • पश्चिम महाराष्ट्र पट्टयाला फाउंड्री आणि अभियांत्रिकी हब म्हणून घोषित करणे, विशेषतः कोल्हापूर, सातारा आणि सांगली यांचा समावेश करणे

  • एमआयडीसीद्वारे संपादित होणाऱ्या जमिनीपैकी पन्नास टक्के फाउंड्री आणि अभियांत्रिकी कंपन्यांना देणे

  • फाउंड्री आणि अभियांत्रिकी कौशल्यासाठी ३ कोटी बजेट

  • प्रथम शिक्षण फाउंडेशन व इतर प्रशिक्षण भागीदारांसोबत करार.

  • पुरेसे आणि योग्य मनुष्यबळ उपलब्ध करणे

आयटी पार्क

  • आयटी पार्क विकासासाठी भू-संपादन आयटी संघटनेच्या समन्वयाने

  • आयटी विकास २०२४ च्या डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्‍ट

  • शेंडा पार्क (३५.७१ हेक्टर) आणि टेंबलाईवाडी (१.२९ हेक्टर) या जमिनी एमआयडीसी, आयटी संघटना, महापालिकाला ‘प्लग अँड प्ले मॉडेल’ तयार करण्यासाठी हस्तांतरित केले जातील.

  • कोल्हापूर आयटी उ‌द्योगाला लघू उ‌द्योग म्हणून हाताळणे

  • भूखंडांचे वाटपासाठी एमआयडीसीसोबत आयटी असोसिएशनचे प्रतिनिधी असलेली समिती

  • आयटी संघटनांच्या धोरण चर्चेत कोल्हापूरमधील आयटी युनिट्सना किमान पन्नास टक्के जमीन वाटप

Kolhapur
Kolhapur : खासदार शाहू महाराज व माने यांची मराठीतून शपथ

मूल्यवर्धन आणि कृषी-प्रक्रिया

  • शिवाजी विद्यापीठासोबत सामंजस्य करार करणे

  • एनएबीएल मान्यताप्राप्त अन्न परीक्षण प्रयोगशाळा करणे

  • गूळ व इतर कृषी उत्पादनांसाठी समर्पित ‘इनक्यूबेशन’ केंद्र

  • कृषी वस्तूंची निर्यात ‘जेएसडब्ल्यू’ बंदरा‌द्वारे सुरू करणे

  • काजू सफरचंदापासून फेणी बनवण्यात धोरणात्मक अडथळे ओळखण्यासाठी मित्र आणि संबंधित भागधारकांशी चर्चा करणे

  • सिंगल विंडो सिस्टम‌द्वारे अडचणी आणि समस्यांचे निराकरण करणे.

वस्त्रोद्योग

  • कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटसाठी (सीईटीपी) प्रस्तावाला गती देणे

  • प्रस्ताव खर्चाचा ५० टक्के हिस्सा पेलण्यास वचनबद्ध

  • सीईटीपीचा विकास २०२४ पर्यंत सुरू करण्याचा प्रस्ताव

  • ‘सिंगल विंडो सिस्टम’ तयार करणे

  • कामगार कल्याणकारी संघटना

  • वस्त्रोद्योगाला खरेदीदार आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा

पर्यटन विकास

  • पर्यटन सर्किट विकसित करणे

  • किल्ल्यांचे पुनर्संचयित आणि साहसी पर्यटन वाढविणे

  • ग्रामीण पर्यटनासाठी पथदर्शी आधारावर १० खेड्यांची ओळख करणे

  • ग्रामीण पर्यटन जिल्हा म्हणून घोषणा

  • चांदी आणि सोन्याच्या दागिन्यांचा समूह, हुपरीचे समर्थन करणे

  • हस्तकला दागिन्यांचा उ‌द्योग विश्वकर्मा योजनेमध्ये समाविष्ट करणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.