Ajit Pawar on Kolhapur Band: सरकारच्या सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळता आल्या असत्या पण...

निवडणुका समोर ठेऊन दंगल घडवण्याचा डाव ? कोल्हापुरातील अशांततेवरून अजित पवारांचा आरोप
Ajit Pawar on Kolhapur Band
Ajit Pawar on Kolhapur BandEsakal
Updated on

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये काल दुपारपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज परिस्थिति चिघळली आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर रस्त्यावर पळापळ आणि चपलांचा ढीग पडल्याचे दिसून आले. (Latest Marathi News)

दरम्यान कोल्हापूरमध्ये सोशल मीडियामधून कुठल्या प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून आता मोबाईल इंटरनेट सेवा बंड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून कंपन्यांना आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.(Marathi Tajya Batmya)

तर पोलिस कोल्हापूर शहरातील परिस्थिति नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. या घटनेवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. या संपूर्ण घडामोडीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पवार बोलताना म्हणाले की, या सर्व घडामोडी का घडत आहेत, जे जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत का? आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या घटना जाणीवपूर्वक केल्या जात आहेत का? याचा तपास केला पाहिजे.(Latest Marathi News)

Ajit Pawar on Kolhapur Band
Cyber Crime: सायबर चोरट्यांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी? फेसबूक अकाऊंट काढून...

कोल्हापूरमध्ये जो राडा झाला, त्यासाठी कोण जबाबदार आहे याचा सरकारने शोध घेतला पाहिजे. त्याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी अजित पवार यांनी केली.(Marathi Tajya Batmya)

अलीकडच्या काळात अशा अनेक घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. आजकाल सर्व गोष्टी तपासता येतात. हे मेसेज कोणी पाठवले. सुरवात कोणी केली या सर्वांचा तपास करता येतो कोणी व्हिडिओ फोटो व्हायरल केले आहेत ते तपासता येते पण त्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्नशील असलं पाहिजे असंही अजित पवार म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

Ajit Pawar on Kolhapur Band
Kolhapur Bandh : कोल्हापुरात दोन गटांमध्ये हिंसक चकमक, जिल्हाधिकाऱ्यांनी उचलले मोठे पाऊल

काल त्यांनी बंद पाळण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी, प्रशासन, पोलिस, शांतता कमिटी काही एनजीओ असतात, पोलिस यंत्रणा यांना सोबत घेऊन ही परिस्थिति नीट हाताळता आला असता. चर्चा करता आली असती. पण त्यासाठी सरकार प्रयत्नशील असलं पाहिजे. त्यांनी असे आदेश दिले पाहिजेत. सरकारच्या हातात सर्व गोष्टी होत्या पण त्यांनी व्यवस्थित हाताळल्या नाहीत. या घटनेवर सर्वपक्षीय बैठका घेता आल्या असत्या. परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आदेश दिला पाहिजे असंही पवार म्हणाले आहेत.(Marathi Tajya Batmya)

Ajit Pawar on Kolhapur Band
Kolhapur Bandh : शाहू महाराजांनी प्रयत्न करून हिंदू मुस्लिम एकतेचा आदर्श रोवला आणि आज कोल्हापूर...

या संबधित अधिकारी, पोलिस यांना विश्वासात घेऊन ही प्रकरण व्यवस्थित हाताळता येत. ही प्रकरण शांततेत हाताळल गेलं पाहिजे असं सांगितलं की सर्व गोष्टी नियंत्रणात राहतात असंही अजित पवार म्हणाले आहेत.

तर या घटना घडतात याला कोण खतपाणी घालत आहे का? या घटना कोणी मुद्दाम घडवत आहे का? अशा गोष्टी तपासल्या पाहिजेत. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहीजेत. यासाठी पोलिसांना मुभा दिली पाहिजे, त्यांच्या पद्धतीने काम झालं पाहिजे सरकारने यामध्ये हस्तक्षेप न करताही परिस्थिति व्यवस्थित हाताळता येऊ शकते असं पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar on Kolhapur Band
Kolhapur Bandh : गृहमंत्री जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवून…; CM शिंदेंनी कोल्हापूरच्या जनतेला केलं 'हे' जाहीर आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.