'पालकमंत्री पाटील यांच्या अहंकाराचं उत्तर जनताच देईल'

amal mahadik criticized on satej patil on the topic of water supply in kolhapur
amal mahadik criticized on satej patil on the topic of water supply in kolhapur
Updated on

कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर टीका केली की चर्चेत येतो, हे माहिती असल्याने महाडिकांच्या नावाचा जप करण्याची सवय अनेकांना आहे.

बावड्यातील पाण्याच्या टाकीच्या उद्‌घाटनावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या टीका केली, ज्यांच्यापासून तुमच्या राजकारणाची सुरवात झाली, त्यांच्यावरच बोट उचलून तुम्ही अहंकार मिरवताय, विरोधात जाणाऱ्यांना संपवण्याची भाषा करताय, हे सगळं जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे. तुमच्या या अहंकाराला जनताच उत्तर देईल, असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी आज लगावला.

भारतीय जनता पक्ष सरकारच्या काळात शहर विकासासाठी भरघोस निधी दिला होता. आज ज्या पाइपलाइन, ड्रेनेजच्या कामांची उद्‌घाटने तुमचे नगरसेवक व तुम्ही करताय, ती कामेही माझ्या प्रयत्नांतून मंजूर झाली आहेत. बावड्यात उद्‌घाटन झालेल्या ‘त्या’ पाण्याच्या टाकीचा प्रश्नही बरीच वर्षे रखडला होता. यासाठी आंदोलन करण्याची वेळ बावडेकरांवर आली होती.

तेव्हा महादेवराव महाडिक यांनी इतरांच्या हाताने काम होत नसेल तर मी ही टाकी बांधून देतो, असे वक्तव्य केले होते. आमच्यावर बोलण्यापेक्षा टाकीच्या कामासाठी कधी मंजुरी मिळाली होती? निधी कुठून आला? काम पूर्ण करायला किती व का वेळ लागला? या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. उत्तर देण्याचे धाडस नसेल तर बावडेकरांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिल्याबद्दल जाहीर माफी मागावी.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.