'आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी राजाराम कारखान्यावरून (Rajaram Factory) सहकारावर बोलणे म्हणजे ही सहकाराचीच चेष्टा आहे.'
कोल्हापूर : ‘ज्यांनी सप्तगंगा कारखान्याचे (Saptaganga Factory) सहा हजार सभासद एका रात्रीत कमी केले, त्या कारखान्याचे नाव बदलून तो स्वतःच्या नावे केला, त्या आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी राजाराम कारखान्यावरून (Rajaram Factory) सहकारावर बोलणे म्हणजे ही सहकाराचीच चेष्टा,’ असे प्रत्युत्तर ‘राजाराम’चे अध्यक्ष अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी दिले.
‘३० वर्षे आम्ही हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राखला. पुढच्या काळातही सभासदांच्याच मालकीचा ठेवणार, याचे अभिवचन देतो,’ असेही त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ‘राजाराम’च्या पोटनियम दुरुस्तीवरून आमदार पाटील यांनी टीका केली होती. त्याला महाडिक यांनी उत्तर दिले.
कारखान्याचे आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांनी पोटशूळ उठल्यानेच त्यांनी बेताल वक्तव्य करून सभासदांमध्ये गैरसमज पसरविण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या कारखान्याचा वार्षिक अहवाल दाखवा आणि १ लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जा, आम्ही विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे द्या, असे आव्हान अनेकदा दिले. आजअखेर त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसून अहवालाचे पानही बघायला मिळालेले नाही.
एकीकडे, सहवीज निर्मिती प्रकल्प का उभारला नाही, आधुनिकीकरण का केले नाही, म्हणून टीका करायची आणि दुसरीकडे अशा प्रकल्पांना विरोध करायचा, ही त्यांची कूटनीती सभासद ओळखत असून, या अपप्रचाराला ते बळी पडणार नाहीत. साखर आयुक्तांनी सहवीज निर्मिती प्रकल्प व मशिनरी आधुनिकीकरण करण्याच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देत असताना स्व भाग भांडवल उभारणीबाबत अट नमूद केल्याने भाग भांडवल उभारणीसाठी वाढीव शेअर्स करणे आवश्यक असल्याचे पत्रकात महाडिकांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.