पिंपळगाव (कोल्हापूर) : बहुरूपी हा करमणूक करणारा मुख्य घटक. प्राचीन संस्कृतीत बहुरूपीस आदराची वागणूक, राजेशाही काळात बहुरूप्याला राजाश्रय. मात्र, बदलत्या विज्ञान व संगणक युगात बहुरूप्याची गरजच उरली नाही. या समाजातील भटके आजही परंपरागत व्यवसाय टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात. टीव्ही आणि मोबाईलच्या जमान्यात बहुरूपी निरुपयोगी ठरत गेला.
शेकडो मैल पायी फिरणारा हा लोककलाकार दुचाकीने चार-सहा गावे एकाच दिवसात पूर्ण करतो. कधी पोलिस निरीक्षकाच्या वेशात, तर कधी पोलिस हवालदाराच्या भूमिकेत त्याचे काम चालू राहते. कधी हा ज्योतिषीही बनून करमणूक करतो. पोट दुखेपर्यंत लोकांना हसवतो. स्वतःची दुःखे बाजूला ठेवून समाजाला हसवणाऱ्या या बहुरूपी लोककलेला अखेरची घरघर लागली आहे. ही मौखिक परंपरेतील लोककला जपायला हवी. शिवकालात शिव बहर्जी नाईक हे आमचे वंशज असल्याचे बहुरूपी सांगतात. दरवर्षी माघ ते वैशाख या चार महिन्यांच्या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील बहुरूपी कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होतात.
अरे दादा बहुरूपी गेला कोठे...?
पोटाची खळगी भरण्यासाठी हल्ली हे लोककलाकार गावोगावच्या यात्रा-जत्रातून हजेरी लावतात. बिरबल आणि बादशहाच्या गोष्टीत हा बहुरूपी भेटतो. परंपरागत व्यवसायात अनेक अडचणी आल्याने अनेक बहुरूपी या क्षेत्रातून बाहेर पडून अन्य व्यवसायात स्थिरावले आहेत.यापूर्वी बहुरूप्याचे मोठे आकर्षण वाटे. मात्र, नवी पिढी अनेक करमणूक साधने अनुभवत असल्यामुळे हल्ली बहुरूप्यांची ओळख राहिली नाही. टीचभर पोटासाठी गावोगाव हिंडणारा हा लोककलाकार आज उपेक्षित आहे. केवळ करमणूक करीत जगणारा आणि समाजाला हसवत जगणारा हा लोककलाकार आज हतबल आहे.
प्राचीन लोककला जपली पाहीजे
बहुरूपी ही समाजाला हसवत ठेवणारी लोककला टिकली पाहिजे, यासाठी या बहुरूपी कलाकारांना समाजाने मदत केली पाहिजे. ही प्राचीन लोककला असून, या कलेचे जतन झाले पाहिजे.
- श्रीपतराव पाटील, निवृत्त शिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.