Kolhapur News : नागपूर अधिवेशनावर १५ ला महामोर्चा; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संप सुरू

मदतनीस व सेविकांचे मानधन किमान १८ हजार ते २६ हजार रुपये करावे
anganwadi workers protest at nagpur winter session 2023 at 15 december politics
anganwadi workers protest at nagpur winter session 2023 at 15 december politicsSakal
Updated on

कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ऑनलाईन कामावर बहिष्कार सुरू राहील, असा इशारा देत नागपूर हिवाळी अधिवेशनावर १५ डिसेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे आज स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौथ्या दिवशी संप सुरू राहिला. राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले असून, त्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या सत्रात मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कर्मचारी महिला संपात सहभागी झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या २५ एप्रिलला ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्वरित भरीव मानधनवाढ जाहीर करावी,

anganwadi workers protest at nagpur winter session 2023 at 15 december politics
Kolhapur News: गाडेगोंडवाडीच्या उपसरपंचपदी हर्षा मेटील बिनविरोध

मदतनीस व सेविकांचे मानधन किमान १८ हजार ते २६ हजार रुपये करावे, महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी, विना योगदान मासिक निर्वाह भत्ता (पेन्शन) सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यंत तयार करून तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा,

महापालिका हद्दीतील जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी पाच ते आठ हजार रुपये इतके भाडे मंजूर करावे, आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये करावा,

अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी प्रा. अतुल दिघे, सुशीला कुलकर्णी, एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवान देशमुख, जीवन सुरूडे, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()