कोल्हापूर, : जिल्ह्यात गायी, म्हशींना लंपी त्वचारोगाची लागण झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील २ गावांत हा आजार आला असून, २५ जनावरे बाधित झाली आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून बाधित जनावरांसह परिसरातील जनावरांचेही लसीकरण सुरू आहे. खबरदारी घेतल्यास जनावरे दगावण्याची शक्यता फार कमी आहे. उपचाराने आजार बरा होतो. यासाठी पशुसंवर्धन विभागाने लसीकरण सुरू केले आहे. औषधोपचार करणे आवश्यक आहे. या आजारावर केवळ शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची उपचार करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
जिल्ह्यात जनावरांच्या लंपी त्वचा रोगाचा शिरकाव झाल्याने पशुपालक चिंतेत आहेत. सध्या हातकणंगले तालुक्यातील २ गावे बाधित झाली आहेत. त्यामुळे गावांच्या ५ किलोमीटर परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. शेजारील सांगली व सातारा जिल्ह्यातही लम्पीच्या आजाराचा फैलाव होत असल्याने या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये खबरदारी घेणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागाकडून सातत्याने जिल्ह्यातील या आजाराबाबतची माहिती घेतली जात असून, खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.
जिल्ह्यातील सद्यस्थिती
बाधित तालुका संख्या १
बाधित गावांची संख्या २
५ किमी परिसरातील गावे ११
बाधित पशुधन संख्या २५
औषधोपचराने बरे रुग्ण १७
उपलब्ध लस संख्या २०४००
लसीकरण करावयचे पशुधन ७५२९
पूर्ण झालेले लसीकरण ४९३७
मृत झालेले पशुधन शून्य
रोगाची लक्षणे
बाधित जनावरांना २ ते ५ आठवडे लक्षण दिसत नाही
त्वचेवर गाठी दिसून येतात
जनावरास तीव्र ताप येतो
डोळ्यांतून पाणी व नाकातून स्राव
भूक व तहान मंदावते
दुग्ध उत्पादन कमी होते
पायावर सूज आल्याने जनावर लंगडते
अशी घ्या खबरदारी
लक्षणे आढळल्यास पशुसंवर्धन दवाखान्यांशी संपर्क साधणे
ज्वर नाशक, सूज कमी येणारी, वेदनानाशक लस टोचून घ्यावी
दुय्यम संसर्ग होऊ नये यासाठीचीही लस टोचावी
गाठीचे रूपांतर जखमेत झाल्यास मलमचा वापर करावा
जनावरातील लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव शक्यतो माणसांना होत नाही, तरीही जनावरांना हाताळणाऱ्या पशुवैद्यकांनी तसेच शेतकऱ्यांनी हातात रबरी हातमोजे घालावेत. बाधित दुधाची विल्हेवाट लावावी. दूध नेहमीच उकळून घ्यावे. पाश्चराईजड दुधाचा वापर करावा. जनावरे हाताळल्यानंतर हात साबणाने धुवावेत. गोठा परिसर निर्जंतुक करावा व किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
-डॉ. वाय. ए. पठाण, पशुसंवर्धन उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.