Keshavrao Bhosale Theatre Fire : ...अन् केशवराव नाट्यगृहातील ॲन्थोनी काका पोरके झाले; आगीमुळं असं काही घडलं की त्यांनी..

Keshavrao Bhosale Theatre Fire : जादूगार भैरव पुढच्या दौऱ्याला निघून गेले आणि ॲन्थोनी एकाकी झाला.
Keshavrao Bhosale Theatre Fire
Keshavrao Bhosale Theatre Fireesakal
Updated on
Summary

सकाळी उठल्या उठल्या अॅन्थोनी पहिल्यांदा नाट्यगृहावर आला आणि दिवसभर सैरभैर अवस्थेत नाट्यगृह परिसरात घुटमळत राहिला.

कोल्हापूर : तीस वर्षांपूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात (Keshavrao Bhosale Theatre Fire) जादुगार भैरव यांच्यासोबत मदतनीस म्हणून कोल्हापुरात आलेले. ॲन्थोनी डिसुझा (Anthony D'Souza) नाट्यगृहातच रमले. जादूगार भैरव पुढच्या दौऱ्याला निघून गेले आणि ॲन्थोनी एकाकी झाला. तेव्हापासून केशवराव नाट्यगृहच ॲन्थोनीसाठी जगण्यासाठी निवारा ठरले. तोच निवारा आगीच्या भक्षस्थानी पडला आणि ॲन्थोनी सैरभैर झाला धाय मोकलून रडू लागला. त्याला फडतरे मिसळचे संचालक प्रवीण फडतरे यांनी जीवाभावाचा धीर दिला.

नाट्यगृहाच्या आवारात उंचापुऱ्या व्यक्तीचा वावर कायम असतो. तिकीट देण्यापासून ते प्रत्येकाचे तिकीट तपासून नाट्यगृहात प्रवेश देण्यापर्यंत डोअरकिपर ते परिसरातील किरकोळ काम करण्यासाठी सदैव धावपळ करताना दिसणारी व्यक्ती म्हणजे ॲन्थोनी. त्यांना कोणी अंकल म्हणतं, कोणी चाचा म्हणतं, तर कोणी मामा म्हणतं या ॲन्थोनीचा वावर जणू नाट्यगृहाचा पूजकच असल्याप्रमाणे. त्यामुळे ते २४ तास नाट्यगृहाच्या आवारातच आहेत, असे नव्हे तर नाट्यगृहानेच ॲन्थोनीच्या जगण्याला जणू निवारा दिला.

Keshavrao Bhosale Theatre Fire
Keshavrao Bhosale Theatre : कोल्हापूरचा मानबिंदू केशवराव भोसले नाट्यगृह भीषण आगीत बेचिराख; नेमकं काय घडलं अन् कशामुळं लागली आग?

नाट्यगृहात येणाऱ्या बहुतांशी रसिक, कलाकारांना तो इतका पाठ झाला आहे की, पुढच्या आठवड्यात कुठलं नाटक आहे, तिकीट किती आहेत माझ्यासाठी राखून ठेव इथेपासून ते बी १६ खुर्ची कुठे आहे सांग इथंपर्यंत सूचना ॲन्थोनीला हमखास होत असतात. रसिकांना त्यांची खुर्ची दाखवणारा येथे ‘क्या साब बहुत दिन हुये, आये नही थे’ अशी आपुलकीने रसिकांची चौकशी करणारा ॲन्थोनी जाता जाता सलाम करतो.

कधी कुणाकडे काही मागत नाही; पण ॲन्थोनीला रसिकच व पालिकेचे कर्मचारी आपापल्यापरीने काही देतात. त्यावरच ॲन्थोनीचे जगणं निभावून जातं. नाट्यगृहाचा निवारा आणि रसिकांच्या आधारावर ॲन्थोनीच्या जगण्याचा प्रत्येक दिवस सुकर होत असल्याचा भाव ॲन्थोनीने अनेकदा बोलून दाखवला, असा निवारा देणारे नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि अँथोनी हडबडून गेला.

Keshavrao Bhosale Theatre Fire
'केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सात दिवसात सादर करा'; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

गर्दीत ढसाढसा रडू लागला. त्याची केविलवाणी स्थिती प्रवीण फडतरे यांनी जाणली आणि तत्काळ अॅन्थोनीला त्यांनी आधार देत आपल्या स्वतःच्या घरी नेलं, जेवू घालत मायेचा आधार दिला. फडतरे यांच्या सौभाग्यवती गुजरातच्या. त्यांनी गुजरातीमध्येच ॲन्थोनीशी संवाद साधला आणि संकटकाळात आपल्या घरचेच कोणीतरी आधार देतोय याची जाणीव ॲन्थोनीला झाली तरीही जळणार नाट्यगृह त्याच्या नजरेसमोरून हटत नव्हतं. सकाळी उठल्या उठल्या अॅन्थोनी पहिल्यांदा नाट्यगृहावर आला आणि दिवसभर सैरभैर अवस्थेत नाट्यगृह परिसरात घुटमळत राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.