खळबळजनक! मोबाईल व्हॅनव्दारे केलेल्या ऍन्टीजेन टेस्टमध्ये 20 जण पॉझिटिव्ह

यापुढे गर्दीच्या ठिकाणी ऍन्टीजेन टेस्ट होणार; प्रशासनाचा निर्णय
खळबळजनक! मोबाईल व्हॅनव्दारे केलेल्या ऍन्टीजेन टेस्टमध्ये 20 जण पॉझिटिव्ह
Updated on

कोल्हापूर : शहरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने मोबाईल व्हॅनव्दारे ऍन्टीजेन टेस्ट करण्याची शक्कल लढविली. यामध्ये आज लक्ष्मीपूरी व्यापारीपेठेत 125 जणांच्या ऍन्टीजेन टेस्ट केल्या. यात सहा जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजी मंडई, व्यापारी ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट असल्याचा संशय महापालिकेला आहे. यापुढे दररोज अशाप्रकारे गर्दीच्या ठिकाणी ऍन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. नागरिकांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. दरम्यान, कपिलतीर्थ भाजी मार्केट येथे घेण्यात आलेल्या स्वॅबमध्ये 14 फळ, भाजी विक्रेते व फेरीवाले पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सोमवारी (12) महापालिकेने कॅम्प घेउन येथे स्वॅब तपासणी केली होती.

कोरोना महामारीचा फैलाव कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. आता पाचशेवर आकडा पोहोचला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि जिल्हाप्रशासनही कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचे विविध उपाय शोधत आहे. लॉकाउन करुनही नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. भाजी मंडईच्या ठिकाणी गर्दी होत आहे. गर्दी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता मोबाईल व्हॅनव्दारे ऍन्टीजेन टेस्ट करण्याची शक्कल लढविली आहे. दोनच दिवसांपुर्वी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तसा इशारा दिला होता. याबाबत आरोग्य विभागाला त्यांनी सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने मोबाईल व्हॅन आणि त्यावर स्टाफची नियुक्ती करुन आजपासून ही मोहिम सुरु केली. आज रविवार एरव्ही आठवडी बाजाराचा दिवस असतो.

संचारबंदी असली तरीही नागरिक भाजीपाला खरेदीच्या निमित्ताने बाहेर पडत असतात. त्यामुळे महापालिकेने पहिल्याच दिवशी लक्ष्मीपूरी बाजारपेठेत ऍन्टीजेन टेस्टची तपासणी करण्याचे ठरविले. त्यानुसार 125 जणांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये 6 जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खळबळ उडाली. बाजारपेठेसारख्या ठिकाणी सहा जण पॉझिटीव्ह फिरत असल्याने त्यापासून अधिकजणांना संक्रमाचा धोका संभवतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने या सहा जणांना उपचारासाठी दाखल केले आहे. अशाप्रकारचा निष्काळजीपणा संक्रमणाला निमंत्रण देणारा असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन केले आहे.

14 फळ, भाजी विक्रेते व फेरीवाले पॉझिटिव्ह

शहरातील फेरीवाले, भाजी विक्रेते यांना आरटीपीसीआर व लसीकरण पूर्ण करुन घेणेबाबतच्या सूचना प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कपिलतीर्थ मार्केट विशेष कॅम्पचे आयोजन केले होते. याठिकाणी 251 फळ, भाजी विक्रेते व फेरीवाले यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 14 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तरी शहरातील अशी मार्केट व गर्दीचे ठिकाणे हॉटस्पॉट बनत असल्याने नागरीकांनी योग्य ती दक्षता घेऊन भाजी व इतर वस्तू खरेदी कराव्यात. या 14 भाजी विक्रेते व फेरीवाले यांना डीओटी सेंटरला अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.