कोल्हापूर: यावर्षी कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek day)साधेपणाने साजरा केला जाणार आहे. सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर (raigad)जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी असेल असे ट्विट खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje)यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला होता. शिवप्रेमी हा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते या दिवशी रायगडावर जमतात त्याठिकाणी मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोना (covid 19)संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकूणच परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे रायगडावर शिवप्रेमींची गर्दी होऊ नये या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे केले आहे.Appeal-of-Sambhaji-Raje-Shiva-devotees-for-Shivrajyabhishek-day-raigad-regarding-agitation
" माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे ; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन." असे ट्टिट करत सर्व शिवप्रेमींना संभाजीराजेंनी आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आरक्षण रद्द झाले आहे.मराठा समाजाला न्याय मिळून देण्यासाठी राज्याभिषेक दिनाला आंदोलनाची पुढील दिशा देण्याचे जाहीर करणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले होते. "रायगडाकडे कूच करा" असा आदेश संभाजीराजांनी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच दिला होता. मात्र आज सोशल मीडियावर ट्विट करत संभाजीराजेंनी शिवभक्तांना घरीच ''शिवराज्याभिषेक सोहळा'' करण्याचे आवाहन केले आहे.
पूढे ते म्हणाले , दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत. मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड ! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज ! हे मात्र यावर्षी साजरे करता येणार नाही.अशी ही खंत त्यांनी व्यक्त केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.