Ambabai Temple : अंबाबाई मूर्तीची झीज? पुरातत्त्‍व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी, अहवाल न्यायालयात होणार सादर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची (Ambabai Idol) काल दुसऱ्या दिवशीही पुरातत्त्‍व विभागाच्या (Archaeology Department) निवृत्त अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
Ambabai Temple
Ambabai Templeesakal
Updated on
Summary

श्री अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याने ती सध्या नाजूक स्थितीत आहे. मूर्तीचे संवर्धन केले जावे, असा दावा श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केला होता.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची (Ambabai Idol) काल दुसऱ्या दिवशीही पुरातत्त्‍व विभागाच्या (Archaeology Department) निवृत्त अधिकाऱ्यांनी पाहणी केली. भारतीय पुरातत्त्‍व विभागाच्या केमिस्ट विभागाचे निवृत्त उपअधीक्षक विलास मांगीराज व सेवानिवृत्त मॉड्युलर आर. एस. त्र्यंबके यांनी ही पाहणी केली.

यामध्ये गाभाऱ्यातील हवामान, उष्णता, आर्द्रता या हवामान विषयक बाबींची त्यांनी माहिती घेतली. या पाहणीचा अहवाल चार एप्रिलपूर्वी न्यायालयात (Court) सादर करावा लागणार आहे. तत्पूर्वी २२ मार्चला तो सादर होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळी सात ते दहा यावेळेत मूर्तीची पाहणी झाली. यामध्ये देवीची नित्य पूजा कशी होते, अभिषेकामध्ये कोणते घटक असतात, तो कसा घातला जातो, या बाबींचीही श्रीपुजकांकडून या निवृत्त अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.

Ambabai Temple
देवदेवतांच्या नावाखाली 12,000 कोटींच्या घोटाळ्यासाठी शक्‍तिपीठ महामार्गाचा अट्टाहास; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

दरम्यान, या पाहणीची गुरुवारपासून सुरुवात झाली असून, काल पाहणीचा दुसरा दिवस होता. श्री अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याने ती सध्या नाजूक स्थितीत आहे. मूर्तीचे संवर्धन केले जावे, असा दावा श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. मूर्तीची स्थिती नेमकी कशी आहे, हे पाहण्यासाठी पुरातत्त्‍व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

Ambabai Temple
'बेस्ट टुरिझम व्हिलेज'मध्ये 'या' गावाची निवड; 126 ग्रामपंचायतींनी घेतला सहभाग, मुरूड बीचचं काय आहे वैशिष्ट्य?

ही मागणी मान्य झाल्यानंतर ही पाहणी झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge), पुरातत्त्‍व विभागाचे सहायक संचालक विलास लहाने, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, श्रीपूजक गजानन मुनीश्वर, लाभेश मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी सल्लागार ॲड. वैभव इनामदार, पुरातत्त्‍व विभागाचे उत्तम कांबळे, ॲड. प्रसन्न मालेकर, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.

दिलीप देसाई यांनी घेतला आक्षेप

पाहणीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कार्यालयात सर्वांनी जावे, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, त्याला दिलीप देसाई यांनी आक्षेप घेतला. पाहणीसाठी आलेले अधिकारी हे कोर्ट कमिशन असून अहवाल थेट न्यायालयातच सादर व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, गेली दोन दिवस मुर्तीची पाहणी सुरू असताना देवस्थान समितीने नेमलेले धर्मशास्त्र मार्गदर्शक कुठे आहेत, असा सवालही काहींनी उपस्थित केल्याची माहिती देसाई यांनी दिली.

Ambabai Temple
Sangli Loksabha : जयंतराव, विश्‍वजित यांची संजय पाटलांसमवेत 'सेटलमेंट'; भाजपच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप

स्टेट बँकेकडून मंदिरात एलईडी वॉल

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भारतीय स्टेट बँकेतर्फे १० बाय १२ ची एलईडी वॉल प्रदान करण्यात आली. यामुळे सीसीटीव्ही कक्षातील नियोजन व पाहणी सुलभ होणार आहे. तसेच मंदिराची सुरक्षा व्यवस्थाही बळकट होईल. स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंदकुमार सिंग, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते फित कापून वॉलचे अनावरण झाले. यावेळी उपमहाव्यवस्थापक पंकज कुमार बनरवाल, क्षेत्रीय प्रबंधक राजीव गुप्ता, सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, राहुल जगताप, अभिजित पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()