धोत्री गल्ली, गंगावेश ते राष्ट्रीय पुरस्कार...!

‘आनंदी गोपाळ’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवलेले सुनील निगवेकर संवाद साधत होते
धोत्री गल्ली, गंगावेश ते राष्ट्रीय पुरस्कार...!
Updated on
Summary

‘आनंदी गोपाळ’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवलेले सुनील निगवेकर संवाद साधत होते

कोल्हापूर : माझं बालपण कोल्हापुरात गेलं... अगदी पंचगंगेपासून ते शुक्रवार, उत्तरेश्वर असो किंवा शहराच्या जुन्या भागातील आठवणी आजही ताज्या आहेत... तांबडा-पांढरा असो किंवा पन्हाळ्याची पिकनिक तेव्हापासून जी सुरू झाली ती आजही वेळ मिळाला की कोल्हापुरात येऊन करतोच करतो...‘आनंदी गोपाळ’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवलेले सुनील निगवेकर संवाद साधत होते आणि कलापूरबद्दलच्या त्यांच्या आठवणींचे विविध पदर उलगडत होते.

दिल्ली येथे नुकताच ६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा झाला. अर्थातच या पुरस्कार वितरण सोहळ्यात मराठी कलाकार, तंत्रज्ञांनी बाजी मारली. त्यातही विशेष बाब म्हणजे मूळचे कोल्हापूरचे श्री. निगवेकर यांच्यासह नीलेश वाघ यांना ‘आनंदी गोपाळ’साठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

धोत्री गल्ली, गंगावेश ते राष्ट्रीय पुरस्कार...!
सर्वांना सोबत घेऊन हद्दवाढ करणारच - आमदार जाधव

‘आरून फिरून गंगावेश’ अशी एक म्हण कोल्हापुरात प्रचलित असली तरी गंगावेश चौक आणि परिसरालाही एक मोठा इतिहास आहे. त्यातही गणेशोत्सव, नवरात्रोत्सवच नव्हेतर वर्षभर विविध मूर्तिकामात येथील कुंभार बांधव व्यस्त असतात. याच कुंभार बांधवांच्या निगवेकरांच्या बुडक्यातील सुनील निगवेकर हे एक शिलेदार. वडील राजाराम लोकनाट्यात काम करायचे. हार्मोनियम वाजवायचे. बहीण शास्त्रीय नृत्यात पारंगत. १९७० च्या सुमारास हे कुटुंब व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला स्थायिक झाले आणि तेथेच सुनील निगवेकर यांचे शिक्षण आणि करियरचा प्रवास सुरू झाला.

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. ‘रोड’पासून ते अगदी ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’‘, ‘शूटआईट ॲड वडाळा’, ‘जंगल’, ‘सरकार’, ‘सरकार-२’, ‘कंपनी‘, ‘वेन्सडे’ अशा पन्नासहून अधिक हिंदी चित्रपटांसह शंभरहून अधिक वेबसिरीजसाठी त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम केले. या प्रवासात मराठी माणूस असूनही मराठी सिनेमासाठी काहीच केले नसल्याची खंत त्यांना वारंवार वाटू लागली आणि चार ते पाच मराठी सिनेमांसाठी त्यांनी कला दिग्दर्शन केले. त्यातीलच ‘आनंदी गोपाळ’ सिनेमासाठी त्यांना पहिल्यांदाच प्रतिष्ठेच्या ‘फिल्मफेअर’'सह राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित केले.

"मुळात कलापूरशी असलेले नातं अगदी कायमपणे जपण्याचा प्रयत्न आजवर केला आहे. वेळ मिळेल तेंव्हा कोल्हापूरला येतो. नातेवाईकांना भेटतो. तांबडा-पांढरा, पन्हाळा हा बेत तर ठरलेलाच असतो. बॉलीवूडमधील कामामुळे मला आर्थिक स्थैर्य मिळाले तर मराठीने सर्वोच्च सन्मान मिळवून दिले."

- सुनील निगवेकर, कला दिग्दर्शक

धोत्री गल्ली, गंगावेश ते राष्ट्रीय पुरस्कार...!
'ACB'ची धडक कारवाई; 15 हजाराची लाच घेताना पोलिस नाईक जाळ्यात

कोल्हापूरशी घट्ट नाळ

सुनील निगवेकर यांची कोल्हापूरशी नाळ घट्ट असल्याची अनेक उदाहरणे देता येतील. येथील मुर्तीकार सर्जेराव निगवेकर यांच्याकडून त्यांनी काही वर्षापूर्वी एका मंदिरासाठी पंचधातूतील स्वामी समर्थांची मुर्ती तयार करून घेतली, हे एक त्यातीलच प्रातिनिधीक उदाहरण.

धोत्री गल्ली, गंगावेश ते राष्ट्रीय पुरस्कार...!
'डॅड मी आर्यनला तुरुंगात एकटं सोडणार नाही'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.