Ashadhi Wari 2024 : कोल्हापुरात असलेल्या पुरातन विठ्ठल मूर्तीच्या पायात आहेत वहाणा? काय आहे सत्य

या मंदिरात विठ्ठलासोबत रखुमाई व सत्यभामा यांच्या ही मूर्ती आहेत
Ashadhi Wari
Ashadhi Wari
Updated on

Ashadhi Wari 2024 :

विठोबाच्या आरतीच्या सुरूवातीला एक ओळ आहे  युगे अठ्ठावीस विटेवरी उभा. पण ही लिला इतर जगाला दाखविली त्याआधी चार युगे ही लिला भगवंतांनी करवीर क्षेत्रात दाखवली आहे. याची साक्ष स्वतः श्रीकृष्णांनी करवीर माहात्म्य ग्रंथात दिली आहे. आता हा द्वारकेचा राणा करवीरात का आला यांच्या दोन कथा  हरिवंश पुराण आणि करवीर माहात्म्य ग्रंथात आहेत. 

हरिवंश पुराणाप्रमाणे भगवंत कालयवन वधासाठी कोल्हापूरात आले. तर करवीर माहात्म्या प्रमाणे एकदा कालयवन वधासाठी तर एकदा स्वस्त्रीयांच्या पापनिष्कृतीसाठी श्रीकृष्ण करवीरात आले.  पुण्य पावन भीमा कात्यायनीच्या भीमाशंकरच्या पायापाशी प्रवाहित होत नंदवाळ ला येते. असं हे पुण्यपावन क्षेत्र करवीर.

मंगळवार पेठेतील श्री विठ्ठलाचे मंदिर साधारण 11 व्या ते 12 व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे. विशेष म्हणजे या मंदिरात विठ्ठलासोबत रखुमाई सत्यभामा यांच्या ही मूर्ती आहेत.विठ्ठलाची मुर्ती खूप सुबक आहे. साधारन तीन ते सव्वातीन फुट मूर्तीची उंची आहे.

Ashadhi Wari
Ashadhi Wari 2023 : पुण्यनगरीत आज वैष्णवांचा मेळा,बंदोबस्तासाठी ७५०० पोलिस तैनात; आठ लाख वारकरी दाखल होणार

मूर्तीच्या उजव्या हातात सूर्य देवतेचे चक्र आहे तर डाव्या हातात शंख आहे. मूर्तीच्या हातातील गहू तोडे खुपच सुरेख आहेत. मूर्तीच्या कानातील मकरकुंडल ही सुंदर आहेत. मूर्तीच्या डोक्यावर महादेवाचे लिंग आहे. मुर्ती वर विविध अलंकारिक दागिने आहेत.

विठ्ठलाच्या डाव्या बाजूस देवी रखूमाईची साधारण अडीज फुट उंचीची मूर्ती आहे. देवीच्या उजव्या हातात कमळ आहे तर श्री विठ्ठलाच्या उजव्या बाजूस देवी सत्यभामा यांची मूर्ती आहे. दोन्ही देवीच्या मूर्तीवर अलंकारिक दागिने आहे.

विठ्ठलाच्या मंदिरासमोरच आई-वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलीकाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे आई वडिलांच मस्तक मांडीवर घेऊन बसलेल्या पुंडलिकाच्या हातात वीट आहे. ही मूर्ती अवश्य पहावी तर उजव्या बाजूस रामाचे प्राचिन असे ओंकारेश्वर मंदिर आहे. व इतर छोटी मंदिरे आहेत.

कोल्हापुरात असलेल्या पुरातन विठ्ठल मूर्तीच्या पायात आहेत वहाणा?
कोल्हापुरात असलेल्या पुरातन विठ्ठल मूर्तीच्या पायात आहेत वहाणा?esakal
Ashadhi Wari
Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! परभणीतून पंढरपूरला जाण्यासाठी १३३ बसगाड्या सोडण्याचा निर्णय

मूर्तीचे अजून एक वैशिष्टय म्हणजे कोल्हापूरी वहाणांसारखी दिसणारी पादकटक नावाची नुपूर देवाच्या पायात आहेत. ही नुपूर रखूमाई व सत्यभामा यांच्या ही मूर्ती वर आहेत. संदर्भ पाहिला तर विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायामध्ये वहाणा असण्याचे शास्त्रशुद्ध कारण आपल्याला कुठेही सापडत नाही. इथल्या लोककथेप्रमाणे विठ्ठलच असा आहे की लोक माणसांमध्ये रुजलेलं दैवत आहे. जुन्या लोकांच्या श्रद्धेनुसार निर्माण झालेल्या अनेक कथा आपल्याला या मूर्तीशी संबंधित सांगितल्या जातात.

त्याप्रमाणे करवीर नगरीत असलेली विठ्ठल मूर्तीबद्दल अख्यायिका आहे की, विठोबा नंदवाळाहुन दुपारी करवीर जगदंबेच्या या मातृक्षेत्री भोजनासाठी येतो. आणि त्यावेळेला देवांच्या पायामध्ये वहाणा असतात असा उल्लेख या करविरातल्या दंतकथांमध्ये पाहायला मिळतो. जर निरीक्षण केलं तर त्या वहाणा नाहीये हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं

याचं कारण म्हणजे त्या वहाणांचा अंगठा असलेला जो भाग असतो. तो पायाचा अंगठा आणि तिच्या शेजारचा बोट हे त्या मधोमध असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट वहाणा असत्या तर वहाणांना तळ असायला हवा. कोल्हापूरमध्ये वहाणा धारण केलेल्या देवतांच्या अनेक मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात.

अशा या वैशिष्ट्य पुर्ण विठ्ठल मुर्तीची रोज काकडारती, अभिषेक घातला जातो. आषाढी कार्तिकी एकादशीला येथे भाविकांची गर्दी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.