कोल्हापूर: आसाम रायफलमध्ये भरतीचे आमिष दाखविणारी टोळी कोल्हापुरात कार्यरत आहे. याबाबतची मालिका ‘सकाळ’ने एप्रिल २०१९ मध्ये प्रसिद्ध केली होती. यातून शाहूवाडी तालुक्यात गुन्हाही दाखल झाला. करवीर तालुक्यातही अशाच पद्धतीने एका तरुणाची सहा लाखांची फसवणूक झाल्याचे आज उघडकीस आले आहे. हे रॅकेट मुळापासून शोधून कारवाई झाल्यास अनेक तरुणांची फसवणूक टाळता येणे शक्य आहे.
करवीर तालुक्यातील एका तरुणाची आसाम रायफलमध्ये भरती करण्याच्या आमिषाने सहा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबतची माहिती खुद्द पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घेतली. तेव्हा लग्नासाठी मुलींकडून नोकरीची मागणी होत असल्यामुळे शेती विकून सहा लाख रुपये दिल्याचे त्यांना सांगण्यात आले. सैन्यात भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुण इच्छुक असतात, लग्नासाठी नोकरी पाहिजे, म्हणून भामट्यांच्या आमिषाला ते बळी पडत असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
दरम्यान, गतवर्षीच आसाम रायफलमध्ये भरती करतो म्हणून शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील काही तरुणांची फसवणूक करण्यात आली. याबाबत ‘सकाळ’ने मालिका प्रसिद्ध केल्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला होता. मात्र अनेक तरुणांची फसवणूक होऊनही पैसे परत मिळतील, या आशाने त्यांनी फिर्याद दिलेली नव्हती. करवीर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातसुद्धा ही फसवणूक २०१४ पासून सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे हे रॅकेट नेमके कोठे पर्यंत कार्यरत आहे. इथंपर्यंत पोलिसांचा तपास पोचला तर नक्कीच यातून आसामपर्यंतची साखळी पुढे येण्याची शक्यता नाकारता
येत नाही.
तक्रारीस टाळाटाळ
आसाम रायफलमध्ये भरती करतो म्हणून फसलेल्या शाहूवाडी तालुक्यातील काही तरुण आजही एजंटाकडे जाऊन त्यांच्याकडे दिलेल्या पैशांची वसुली करीत आहेत. पोलिसांत तक्रार दिल्यास आपण अडचणी येईल, अशी भीती त्यांना आहे. त्यामुळेच ते पोलिसांकडे फिर्याद देण्यास येत नसल्याचे शाहूवाडी तालुक्यातून सांगण्यात आले.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.