Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

Assembly Election Third Front : शिरोळ विधानसभा मतदारसंघात स्वतः राजू शेट्टी (Raju Shetti) रिंगणात राहतील की, कार्यकर्त्याला संधी देणार हा उत्सुकतेचा विषय असेल.
Assembly Election Third Front
Assembly Election Third Frontesakal
Updated on
Summary

तिसऱ्या आघाडीतील शेट्टी यांच्यापेक्षा संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. संभाजीराजे स्वतः राज्यसभेवर खासदार होते.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावरच स्थापन झालेल्या तिसऱ्या आघाडीत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) व राजू शेट्टी यांच्यासमोर स्वतःच्या ‘होमपीच’ वरच आव्हानांचा डोंगर आहे. उमेदवार ठरवताना या दोघांची कसोटी तर लागणार आहेच; पण संभाजीराजे यांचे वडील खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे काँग्रेसचे असल्याने त्यांच्याविरोधात ते जिल्ह्यात किती उमेदवार देणार याविषयीही उत्सुकता असेल.

दरम्यान, शिरोळ विधानसभा मतदारसंघात स्वतः राजू शेट्टी (Raju Shetti) रिंगणात राहतील की, कार्यकर्त्याला संधी देणार हा उत्सुकतेचा विषय असेल. याशिवाय इचलकरंजी आणि राधानगरी, वाळवा मतदारसंघात त्यांचा प्रभाव पाहता ते आव्हान उभे करू शकतील.

Assembly Election Third Front
विसर्जन मिरवणुकीत भाजपमधील दुफळी उघड; सत्यजित कदमांनी उभारला स्वतंत्र स्वागत कक्ष, जुना-नवा वाद चव्हाट्यावर!

माजी मंत्री बच्चू कडू यांची ‘प्रहार’ संघटना, संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष व शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना मिळून तिसऱ्या आघाडीची घोषणा या तिघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आज केली. या आघाडीत अन्य कोणते पक्ष समाविष्ट होतील हे निश्‍चित नाही; पण याचा फटका मात्र महाविकास आघाडीला बसणार की, महायुतीला हे उमेदवार निश्‍चितीनंतरच कळेल. सद्य:स्थितीत या तिसऱ्या आघाडीची मदार महायुती व महाविकास आघाडीतील बंडखोरांवरच अवलंबून आहे.

Assembly Election Third Front
Congress : वादग्रस्त वक्तव्य भोवलं! 'या' बड्या नेत्याची काँग्रेसमधून हकालपट्टी, रेड्डींवर अध्यक्षपदाची जबाबदारी

तिसऱ्या आघाडीतील शेट्टी यांच्यापेक्षा संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. संभाजीराजे स्वतः राज्यसभेवर खासदार होते. त्यामुळे त्यांचा म्हणून असा स्वतंत्र मतदारसंघ नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झाले. वडील म्हणून मी त्यांचा प्रचार केल्याचे त्यांनी जाहीर करत आपली वेगळी भूमिका कायम ठेवली होती. आता विधानसभेला त्यांच्या वाट्याला जिल्ह्यात येणाऱ्या जागांवर उमेदवार कोण असेल याविषयी उत्सुकता आहे. मुळात त्यांना उमेदवार मिळवण्याच्या पातळीवरच मोठी लढाई करावी लागेल. त्यात ही निवडणूक खर्चिक असते.

Assembly Election Third Front
Chandrakant Patil : आमच्या 'त्या' चुकीमुळे विधानसभेत अमल महाडिकांचा पराभव झाला; मंत्री चंद्रकांत पाटलांची कबुली

मतदारसंघही मोठे आहेत. त्यामुळे आर्थिक पातळीवर भक्कम, मोठा जनसंपर्क असणे, सर्व पातळीवर तयारी केलेले उमेदवार शोधून आपल्याकडे खेचणे आव्हानात्मक असेल. शेट्टी यांनी सलग दोन वेळा हातकणंगलेतून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे त्या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात कमी-अधिक प्रमाणात का असेना त्यांना मानणारा वर्ग आहे. तरीही शिरोळ, राधानगरी वगळता अन्य ठिकाणी दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील त्यांचा कार्यकर्ता विधानसभा लढवण्यासाठी सक्षम दिसत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांवर उमेदवार ठरवताना त्यांचीही पंचाईत होणार आहे.

बंडखोरांवरच अवलंबित्‍व

घटक पक्षांमुळे महाविकास आणि महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी आहे. तीन-चार मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांत या दोन्ही आघाडीत बंडखोरीची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत या बंडखोरांना आपल्या तिसऱ्या आघाडीत घेऊन त्यांना उमेदवारी देण्यावरच त्यांचा भर राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.