Kolhapur : आंबेडकरनगरात भाजप सरचिटणीसाच्या घरावर जमावाचा लोखंडी रॉडने हल्ला; सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल

रॉबीन कांबळे आणि आदेश कांबळे यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली.
BJP General Secretary Shahupuri Police
BJP General Secretary Shahupuri Policeesakal
Updated on
Summary

आंबेडकरनगरातील उद्यानात गुरुवारी झालेल्या कोयता हल्ल्याचे पडसाद म्हणून आजचा हल्ला होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूर : भाजपचे येथील सरचिटणीस (BJP General Secretary) सदानंद राजवर्धन यांच्या घरावर काल (शुक्रवार) काहींनी हल्ला केला. कसबा बावडा (Kasaba Bawada) येथील आंबेडकरनगरात हा प्रकार घडला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

BJP General Secretary Shahupuri Police
Rickshaw Accident : 'त्या' सेल्फी पाठोपाठच धडकली मृत्यूची बातमी; गणेशोत्सवाला मुंबईहून गावी आलेला युवक अपघातात ठार, दोघे जखमी

याबाबत त्यांची पत्नी संपदा यांनी शाहूपुरी पोलिस (Shahupuri Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की, दुपारी बारा-पंधराजणांच्या जमावाने दहशत माजवली. शिवीगाळ करून घरासमोरील दुचाकींचे नुकसान केले. पती सदानंद यांना जीवे मारण्याची धमकी दिली. लोखंडी रॉड त्यांच्या घराच्या दिशेने फेकून मारला.

BJP General Secretary Shahupuri Police
Miraj Ganeshotsav : ठाकरे सेनेच्या कमानीवर गुवाहाटीचे चित्र; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप, वाद चिघळण्याची शक्यता

शेजारी राहणारे मयुरेश शरद शिंगे यांना एडक्याने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी आदेश अनिल कांबळे, संतोष चव्हाण, रॉबीन कांबळे, गुरू (पूर्ण नाव नाही, सर्व रा. उलपे मळा), शेखर आणि श्रेयस यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सिंदकर यांनी दिली.

गुरुवारच्‍या हल्ल्याचे उमटले पडसाद

आंबेडकरनगरातील उद्यानात गुरुवारी झालेल्या कोयता हल्ल्याचे पडसाद म्हणून आजचा हल्ला होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोयता हल्ला प्रकरणात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पैकी अनिल विलास कांबळे (वय २४, रा. आंबेडकरनगर) याला अटक केली.

BJP General Secretary Shahupuri Police
Bus Accident : गर्भवती महिलेच्या उपचारासाठी जाताना आरोग्यसेविकेवर काळाचा घाला; डोक्यावरुन एसटी गेल्याने जागीच ठार

पोलिसांनी सांगितले की, जखमी सूरज कांबळेने दिलेल्या फिर्यादीनुसार, वेदांत राजवर्धन, अनिल कांबळे, विवेक राजवर्धन, आदित्य कांबळे, गब्बर सूर्यवंशी व अनोळखी तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. जखमी अनिल कांबळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार विरोधी गटातील पप्पू सुतार याने गळपट धरून शिवीगाळ केली. केतन भोसले याने चाकूने डाव्या पंजावर, दंडावर, खांद्यावर वार केले. रॉबीन कांबळे आणि आदेश कांबळे यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.