Ambabai Temple : सलग पाचव्या दिवशी अंबाबाई मंदिरात 60 हजारांवर भाविकांची हजेरी; दर्शन मंडप हाऊसफुल्ल

नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाचे स्वागत असा मुहूर्त साधत अनेकांनी सहकुटुंब धार्मिक सहलींचे आयोजन केले आहे.
Kolhapur Ambabai Temple
Kolhapur Ambabai Templeesakal
Updated on
Summary

गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने योग्य ती खबरदारी घेतली आहे.

कोल्हापूर : सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सलग पाचव्या दिवशी आजही ७९ हजारांवर भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे (Ambabai Temple) दर्शन घेतले. गेल्या पाच दिवसांत रोज किमान साठ हजार भाविक मंदिरात दर्शनासाठी आले.

सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होत असल्याने दर्शन मंडपातून भवानी मंडपमार्गे (Bhavani Mandap) गुजरीपर्यंत काही काळ रांगा जात आहेत. दरम्यान, गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने योग्य ती खबरदारी घेतली आहे. शुक्रवारपासून मंदिरात गर्दीला प्रारंभ झाला. तब्बल ६८ हजारांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी आले. शनिवारी ८१ हजारांवर, तर रविवारी सर्वाधिक एक लाख ६५ हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले.

Kolhapur Ambabai Temple
मुश्रीफांची राजकीय भूमिका गुलदस्त्यात; महाडिकांच्या नव्या गट्टीने भविष्यातील राजकारण ठरणार अडचणीचे?

कालही ९४ हजारांवर, तर आज दिवसभरात ७९ हजारांवर भाविक मंदिरात आले. पाच दिवसांत सुमारे पाच लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर दर्शन मंडप हाऊसफुल्ल राहत असून, आणखी चार ते पाच दिवस गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे मंदिर परिसराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असून येथे वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Kolhapur Ambabai Temple
'8 एप्रिल 1627 हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी'; ज्येष्ठ इतिहास संशोधकाचं स्पष्ट मत

नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाचे स्वागत असा मुहूर्त साधत अनेकांनी सहकुटुंब धार्मिक सहलींचे आयोजन केले आहे. साहजिकच अंबाबाई मंदिरात वाढती गर्दी आहे. त्यामुळे बिंदू चौक पार्किंगमध्येही दिवसभर हाऊसफुल्ल अशीच स्थिती आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास तर पार्किंगमध्ये पोहोचण्यासाठी बिंदू चौक सबजेल मार्गावर वाहनांची रांग लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.