Kolhapur Politics : 'गेली 35 वर्षे मी तुमची हनुमानासारखी सेवा केली, पण तुम्ही अपमानास्पद वागणूकच दिली'

गेली ३५ वर्षे मी तुमची हनुमानासारखी सेवा केली.
AY Patil vs KP Patil
AY Patil vs KP Patilesakal
Updated on
Summary

'बिद्री कारखान्याच्या एका निवडणुकीने हुरळून जाऊ नका. ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणाला काय काय दिले व काय देणार आहात ती वचने पाळा, त्यांनाही फसवू नका.'

सोळांकूर : ‘सोळांकूरचा टोल नाका’ उद्‌ध्वस्त झाला असे म्हणणाऱ्या के. पी. पाटील यांनी हा टोल नाका होता म्हणून दहा वर्षे आमदारकीची सत्ता भोगली. आता मुदाळचाच ‘टोल नाका’ बंद झाल्याने भुदरगड तालुक्यात माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व मतदारांना आता मला भेटण्यास मोकळीक मिळाली’, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील (A. Y. Patil) यांनी एका पत्रकाद्वारे के. पी. पाटील (K. P. Patil) यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, के. पी. पाटील, आपण आमदार झाल्यानंतर मतदारसंघात कधी साधे फिरकलाही नाही. आपणास भेटावयास आलेल्या एकाही कार्यकर्त्याची वा मतदाराची साधी विचारपूसही कधी केली नव्हती. आपल्याला सत्तेची धुंदी असल्याने त्यावेळी आपले विमान कधी जमिनीवर टेकले नव्हते. आमदारकीच्या काळात सर्व कार्यकर्ते तक्रारीचा पाढा वाचत होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना शांत करण्याचे काम मी केले आहे. हे विसरू नका.

AY Patil vs KP Patil
Udayanraje Bhosale : महापुरुषांच्या बदनामीविरोधात उदयनराजे आक्रमक; अमित शहांकडे केली 'या' कडक कायद्याची मागणी

या टोल नाक्यावर केवळ राधानगरी तालुक्याचा सुरक्षारक्षक म्हणूनच राहिलो होतो. गेली ३५ वर्षे मी तुमची हनुमानासारखी सेवा केली. माझ्यासारख्या प्रमुख कार्यकर्त्याला नेहमी आपण अपमानास्पद वागणूक दिली. तालुक्यात माझ्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझ्याविषयी खोटेनाटे सांगून मतभेद निर्माण करण्याचे काम आपण केले. विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत आपणास राधानगरी तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे.

AY Patil vs KP Patil
Rajesh Kshirsagar : लोकसभेसाठी कोल्हापूर-हातकणंगलेत धडाडणार मुख्यमंत्री शिंदेंची तोफ; 'या' दिवशी होणार मेळावे

गत निवडणुकीतील भुदरगड तालुक्यातील मतदारांची आकडेवारी तपासावी, सर्वसामान्य मतदारांनी आपणास नाकारले आहे. बिद्री कारखान्याच्या एका निवडणुकीने हुरळून जाऊ नका. ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणाला काय काय दिले व काय देणार आहात ती वचने पाळा, त्यांनाही फसवू नका. मी स्वाभिमानी आहे. सत्तेसाठी कोणालाही आजपर्यंत फसवले नाही आणि फसवणारही नाही. कोण योग्य आहे हे येणाऱ्या निवडणुकीत काळच ठरवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()