Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर उत्सवाची जगाच्या इतिहासात नोंद घेतली जाईल - मंत्री चंद्रकांत पाटील

मंत्री पाटील यांच्या हस्ते दसरा चौकात उभारलेल्या श्री रामाच्या १०८ फूट उंच कटआऊटचे अनावरण झाले.
Kolhapur Ayodhya Ram Mandir Chandrakant Patil
Kolhapur Ayodhya Ram Mandir Chandrakant Patilesakal
Updated on
Summary

खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी श्रीरामाचे १०८ फूट उंच कटआऊट उभे करून त्यांच्या मनातील श्रद्धा व्यक्त केली आहे.

कोल्हापूर :अयोध्येतील मंदिरात (Ayodhya Ram Mandir) २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असून, तो दिवस देशातील प्रत्येक माणूस दिवाळीप्रमाणे साजरा करेल’, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी येथे केले. ‘जगाच्या इतिहासात उत्सवाची नोंद घेतली जाईल. त्यात कोल्हापूरही मागे नसेल’, असेही ते म्हणाले.

मंत्री पाटील यांच्या हस्ते दसरा चौकात उभारलेल्या श्री रामाच्या १०८ फूट उंच कटआऊटचे अनावरण झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, यावेळी ‘एकही नारा, एकही नाम, जय श्रीराम जय श्रीराम’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘रामभक्त हनुमान की जय’, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. येथे एकवीस हिंदुत्त्ववादी संघटनांचे प्रतिनिधींची विशेष उपस्थित होती.

Kolhapur Ayodhya Ram Mandir Chandrakant Patil
ऐतिहासिक दसरा चौकात उभारली प्रभू श्रीरामांची तब्बल 108 फुटी भव्य प्रतिमा; मंत्री पाटील, महाडिकांच्या उपस्थितीत आज अनावरण

मंत्री पाटील म्हणाले, ‘आरक्षणासाठी सर्व्हे करावा लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. गावातील सोळा कर्मचारी त्यादृष्टीने नोंदी शोधत आहेत. कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे. तसेच देशभरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा उत्सव साजरा केला जात आहे.

Kolhapur Ayodhya Ram Mandir Chandrakant Patil
Success Story : 8 गुंठ्यात उभारला दिशादर्शक उद्योग; रोज 9000 अंड्यांचं उत्पादन, उच्चशिक्षित तरुणाचं धाडसी पाऊल

खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी श्रीरामाचे १०८ फूट उंच कटआऊट उभे करून त्यांच्या मनातील श्रद्धा व्यक्त केली आहे. प्रत्येकाने २२ जानेवारीचा दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे. राज्य शासनाने सुटी जाहीर केली आहे. मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर सायंकाळी दिवाळी साजरी करण्यास नागरिक उत्सुक आहेत. प्रत्येक घरासमोर रांगोळी रेखाटली जाणार असून, आकाश कंदील लावण्यात येणार आहेत.’

याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, विजय जाधव, महेश जाधव, सुनील कदम, राहुल चिकोडे, प्रा. जयंत पाटील, राजवर्धन निंबाळकर, संग्राम निकम, महेश वासुदेव, संताजी घोरपडे, कृष्णराज महाडिक, मुकुंद भावे,अनिरूद्ध कोल्हापुरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.