कोल्हापूर : गेल्या दोन दिवसापासून शहर आणि परीसरात गव्याचे (Baison)दर्शन होत आहे. आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी औद्योगिक पंचतारांकित वसाहतीच्या (Five Star Industrial colony)पिछाडिस (कागलजवळ) पश्चिम बाजूला कोल्हापूर (Kolhapur)शहराजवळ दुसरा गवा आढळला आहे. गेल्या दोन दिवसापासून शहरात धुमाकुळ घातलेला गवा हा शिये-भुये या मार्गाने जोतिबा डोंगराकडे मार्गस्थ झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. यापाठोपाठच पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या पूर्व बाजूला दुसरा एक गवा आला आहे. या गव्याचा माग काढण्यासाठी वनविभागाचे पथक (Forest Department Squad)काल (ता.१०) रात्रीपासून धावपळ करत आहेत. दरम्यान, कोल्हापुरात गेल्या दोन दिवसापासून शहर आणि परीसरात गव्याचे दर्शन होत असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा होत आहेत. गव्याचे वारंवार दर्शन घडत असल्यामुळे हा औत्सुक्याचा विषय ठरत असून, तरूण वर्गात हास्य विनोद ही घडत आहेत. अरे भावा पुन्हा आला गवा अशा पध्दतीने सध्या सोशल मीडियावर गव्याच्या येण्याची हवा आहे. (Baison Entry Kolhapur)
गेल्या दोन दिवसापासून शहर आणि परीसरात गव्याचे दर्शन होत असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा गवा ऊसशेतीमधून एका ओढ्यात गेला व ओढ्यातून ऊसशेतीत लपला असण्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला असून, सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर शहरापर्यत गवा आला त्यामुळे खळबळ उडाली आहे. हा पंचतारांकित वसाहतीत आलेला गवा भुदरगडच्या जंगला कडून आला असल्याचा अंदाज आहे. मात्र हा गवा गेल्या दहा दिवसापासून कसबा सांगाव, मौजे सांगाव या परीसरातील ऊसशेतीमधेच भटकत असल्याचेही वनविभागाकडून सांगण्यात येत आहे . काही तासांपूर्वीच हा गवा एमआयडीसी लगत असलेल्या कालव्याच्या बाजूनी वावरला असल्याचे त्याच्या पाऊल ठशावरून दिसते आहे. वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राचे डाॅ संतोष वाळवेकर व त्यांचे सहकारी या गव्याची आरोग्य तंदुरुस्तीचे निरीक्षण करत आहेत.
तसेच मानवीवस्तीकडे गवे का येत आहेत याबाबतची सविस्तर माहिती बायसन नेचर क्लब राधानगरी संस्थापक अध्यक्ष सम्राट केरकर यांनी दिली. सध्या पश्चिम घाटातील सस्तन प्राण्यातील सर्वात मोठा असलेला गवा हा जंगलसोबतच आता आजूबाजूच्या गावात जिथे गर्द झाडी झुडपे आहेत व जवळच शेती आहे अशा ठिकाणी आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 10 ते 15 वर्षात गव्यांचा 2 ते 3 पिढ्या तरी आता उसाची शेती व जवळील विश्रांतीसाठी डोंगर दऱ्यातील वनराई हेच अधिवास तयार झाले आहेत. दाट जंगलातील, अभयारण्यातील गवे हे खूप लाजाळू असतात गाडी अथवा माणसाला पाहून पळून जातात पण हे गावांजवळ वाढलेले गवे बऱ्या प्रमाणात माणसाळलेले वाटतात.
पावसाळा संपला व उसतोडीचा सिझन सुरु झाला की शेतकऱ्यांची शेतात जास्त लगबग सुरु होते या काळात हे गवे, कळप शेतात दिसले की त्या भागातील शेतकरी त्यांना हुसकावून लावतात.पण जेव्हा हे हुसकावून लावले जातात त्यावेळी त्यांना पश्चिमेकडे न जाता पूर्व दिशेला हुसकावून लावले असता ते सैरभैर होतात व पूर्व भागातील अनेक गावातील गायरान,डोंगर व शेतीमधून गावात, शहरापर्यंत जाऊन पोहचतात. आणि आजकाल सोशल मीडिया च्या जमान्यात गवा शहराजवळ येणे हे ब्रेकिंग न्यूज होते.आता गव्यांचा अधिवास बदलला आहे. असं माझं ठाम मत आहे. येणाऱ्या काळात गवे हे शहरात येणे नित्याचे होणार आहेत. शासनाने भविष्यात गव्या सारखा मोठ्या प्राण्याला ट्रँक्विलायझर करून पुन्हा जंगलात सोडण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.
सम्राट केरकर, संस्थापक अध्यक्ष बायसन नेचर क्लब राधानगरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.