राजकारणाबाबत भाकणूक सांगते, राजकारणी मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या मारतील
सध्या आतंरराष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या रशिया युक्रेनमधील युद्धाचे भयंकर परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. जगातील अनेक देश एकमेकांशी लढतील, एकमेकांचे भाग काबीज करतील. त्यामुळे जगात तिसरे महायुद्ध होणार आहे. भारत -पाकिस्तान युद्ध सुरूच राहील. याशिवाय भारतावर आणखी तीन देश आक्रमण करतील, अशी बाळूमामा भाकणूक कृष्णा बाबुराव ढोणे पुजारी वाघापूरकर यांनी केली. (Kolhapur) श्री क्षेत्र आदमापुर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा भंडारा (Admapur) यात्रा प्रसंगी भाकणूक कार्यक्रमात भविष्यवाणी केली. मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्यामुळे आगामी वर्षात काय होणार याचा सूचक इशारा येथे मिळत असल्याने साऱ्याचे लक्ष या भाकणुकीकडे लागून राहते. (balumama bhandara bhaknuk)
यादरम्यान, त्यांनी केलेली भाकणूक अशी, अठरा तर्हेचा एक आजार होईल. कालवा कालव होईल. जगावर आजारांची संकट येतील. आजारावर औषध मिळणार नाहीत. डॉक्टर लोक हात टेकतील. जगावर आलेलं कोरोनाचं संकट कमी जास्त होईल. कोरोना पेक्षा मोठी महामारी येईल. कलयुगात मनुष्याला अल्प आयुष्य लाभले. हा सगळा मायेचा बाजार हाय. निती धर्माला अनुसरुन वागा. सुखात ठेवीन. माणूस माणसाला खाईल. कापाकापी होईल. दिवसाढवळ्या दरोडेखोराकडून लुटमार होईल.
देश आणि राज्याच्या राजकारणासंदर्भात ही भाकणून सांगते, देशाच्या, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या मारतील. राजकारणी मंडळी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण राहील. कमळ पक्षाचा झेंडा मिरवेल. राजकारणात महिलावर्ग बाजी मारेल. राजकारणात लोक देवा धर्माला विसरुन जातील. पैसा न खाणारा सापडणार नाही. भ्रष्टाचार उंदड होईल. नेतेमंडळी तुरुंगात जातील. राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल.
साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांकी राहील. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. उसाच्या कांड्यांचा दुधाच्या भांड्यानं राज्या-राज्यात गोंधळ निर्माण होईल. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होईल. सीमा भागातले राजकारण ढवळून जाईल. निपाणी भागात मोठा गोंधळ होईल. सीमा प्रश्न राजकीय लोकांच्या फक्त चर्चेत राहील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.