असळज (कोल्हापूर) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांचे गगनबावडा तालुक्यातील वेसरफ येथील समर्थक बयाजी शेळके (bayaji shelake) यांचा विजय झाला. सर्वसामान्य धनगर समाजातील शेळके यांच्या रूपाने 'गोकुळ'च्या (gokul election) इतिहासात गगनबावडा (gaganbawda) तालुक्यास प्रथमच ही संधी मिळाली. एकीकडे मातब्बर चेहरे, नेत्यांचे वारसदार गोकुळच्या उमेदवारीच्या रिंगणात असताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी मात्र धनगर समाजातील शेळके यांच्या रूपाने 'गोकुळ'मध्ये गगनबावड्याला संचालक होण्याची संधी दिली.
वेसरफ येथील बयाजी शेळके यांना राजकीय वारसा नाही, ते शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्ते आहेत. वेसरफ येथील लोकांना असळज येथे दोन किलोमीटरची पायपीट करून दूध घालण्यासाठी जावे लागे. त्यामुळे वेसरफ येथे दूध संस्थेची गरज ओळखून बयाजी शेळके यांनी कॉलेजमध्ये शिकत असताना रासाईदेवी दूध संस्थेची स्थापना केली. संस्था सचिव म्हणून काम करण्यास कोणी तयार नव्हते, यावेळी बयाजी शेळके यांनी स्वतः जबाबदारी घेत एक वर्ष सचिव म्हणून काम पाहिले. सध्या ते या संस्थेचे चेअरमन (chairman) आहेत. त्यांच्या या निवडीने एका दूध संस्थेचा सचिव, संस्थेचे अध्यक्ष ते संघाचा संचालक अशी झेप त्यांनी घेतली आहे.
'गोकुळ'च्या स्थापनेपासून गगनबावडा तालुक्याला कधीही उमेदवारीची संधी मिळालेली नव्हती. अनपेक्षितपणे बयाजी शेळके यांचे नाव चर्चेत आले आणि त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारीची संधी देत विजयी केले. शेळके यांच्या निवडीने पालकमंत्री पाटील यांनी गगनबावडा तालुक्याबरोबर निष्ठावंत धनगर समाजातील कार्यकर्त्याचा सन्मान केल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे. बयाजी शेळके यांनी तालुका व जिल्हास्तरावर धनगर समाजाच्या प्रश्नांविषयी आंदोलने, युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक प्रश्नासंदर्भात आंदोलने केली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.