महाआघाडीत संघर्ष? एकत्र येऊन लढायचं होतं पण...

'मी तुमच्या पाठीशी आहे, कसल्याही दबावाला भिऊ नका, काळजी करण्याचे काम नाही'
महाआघाडीत संघर्ष? एकत्र येऊन लढायचं होतं पण...
Updated on
Summary

'मी तुमच्या पाठीशी आहे, कसल्याही दबावाला भिऊ नका, काळजी करण्याचे काम नाही'

पेठवडगाव : महाविकास आघाडीतील काही नेते मंडळींनी जरी दुसऱ्यांची बाजू घेतली असली तरी हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पटणार नाही, त्यामुळे उलट त्याविरोधात सर्वसामान्य कार्यकर्ते जिद्दीने पेटून उठला आहे. वडगाव बाजार समिती निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण ताकतीने लढा देणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. वडगाव बाजार समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या पॅनेलची घोषणा मंत्री मुश्रीफ व आमदार राजू आवळे यांनी केली. या वेळी ते बोलत होते.

महाआघाडीत संघर्ष? एकत्र येऊन लढायचं होतं पण...
देशाला १९४७ ला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं - विश्व हिंदू परिषद

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्हिडिओ कॉल करून उमेदवारांच्या बरोबर चर्चा केली. 'मी तुमच्या पाठीशी आहे, कसल्याही दबावाला भिऊ नका, काळजी करण्याचे काम नाही, सर्वोतोपरी मदत करू, असे अश्वासन दिले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, 'आमच्या आघाडीतील उमेदवार सक्षम, सर्वसामान्य असल्यामुळे सभासदांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्री पाटील, खासदार धैर्यशील माने यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच भव्य मेळावा घेतला जाणार आहे. महाआघाडी एकत्र येऊन लढण्याची तयारी होती. परंतु आम्हाला विचारात घेतले नाही, तरीसुद्धा ताकदीने हिंमतीने ही निवडणूक लढवू व विजय मिळवू.'

आमदार राजू आवळे म्हणाले, 'धनाढ्य शक्ती विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ते अशी ही लढाई आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकसंघपणे प्रस्थापितांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.' या वेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भगवान जाधव, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष संभाजी पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमूख सात्तापा भवान, चेतन चव्हाण, रामभाऊ लोकरे, संदीप दबडे, हर्षवर्धन चव्हाण, किरण माळी, शिवाजी भोसले आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे पॅनेलचे उमेदवार असे -

*सेवा संस्था गट- सर्वसाधारण-महादेव भोसले, गिरीश इंगवले, सुहास पाटील, अर्जुन पाटील, उदय पाटील, श्रीकांत निकम, सुनील देशमुख,

* महिला प्रतिनिधी- यशोदा चौगुले, वैशाली पाटील

* इतर मागासवर्गीय- सलीम महालदार

*भटक्या विमुक्त जाती-जमाती-शिवाजी वाघमोडे

*ग्रामपंचायत गट-स र्वसाधारण- संभाजी पवार, सुकुमार चव्हाण

* आर्थिक दुर्बल -पांडुरंग पाटील

* अनुसूचित जाती-विश्वास कुरणे

* हमाल तोलाई गट - सुखदेव माने

* अडते व्यापारी-राजेंद्र मोकाशी, चंद्रकांत तेली.

महाआघाडीत संघर्ष? एकत्र येऊन लढायचं होतं पण...
पंतप्रधान मोदी आज करणार काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन

आघाडीत संघर्ष

या निवडणुकीत महाविकास आघाडीतील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी विरोधी आघाडीत असल्याचे बोलले जात आहे. जरी ते उघड नसले तर त्यांनी उमेदवारीबाबत तडजोड करून कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यामुळे आघाडीतील संघर्ष उघड झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.