मतमोजणी कोल्हापूर येथे शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये होणार आहे.
राशिवडे बुद्रुक : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या (Bhogavati Cooperative Sugar Factory) सत्तेसाठी काल (रविवार) ८६.३३ टक्के इतके मतदान झाले. तीन आघाडी प्रमुखांची प्रतिष्ठा आणि आजी-माजी संचालकांसह एक्याऐंशी उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत आज बंद झाले आहे.
गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी नऊ टक्के अधिक मतदान झाल्याने हा ‘टक्का कुणाला देणार धक्का’ हे आज (ता. २०) कळणार आहे. मतमोजणी कोल्हापूर येथे शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये होणार आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या कारखान्यासाठी प्रारंभापासूनच बिनविरोधबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र, अंतिम टप्प्यात तीन आघाड्या रिंगणात उतरल्या.
सताधारी अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ए. वाय. पाटील, अरुण डोंगळे यांनी साथ दिली. विरोधी दोन आघाड्यांचे नेतृत्व अनुक्रमे धैर्यशील पाटील आणि सदाशिवराव चरापले, जालंदर पाटील, हंबीरराव पाटील यांनी केले. आठ दिवस जोमाने सभा घेऊन वातावरण तापले व आज तितक्याच इर्षेने मतदान झाले.
या निवडणुकीसाठी ‘अ वर्ग’ उत्पादक सभासद आणि संस्था प्रतिनिधी असे २७ हजार ५६२ मतदार पात्र होते. यापैकी २३ हजार ७९३ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कारखाना कार्यक्षेत्रातील ५८ गावांतील ८१ केंद्रांवर आज शांततेत मतदान झाले. बारा विद्यमान संचालक, नऊ माजी संचालक, नऊ आजी -माजी संचालकांचे नातेवाईक आणि उर्वरित ५१ नवख्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले.
गत पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत तब्बल नऊ टक्क्यांनी यावेळी मतदान वाढले असून, हा वाढलेला टक्का कुणाच्या फायद्याचा ठरणार हे उद्याच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. कोल्हापुरातील रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, ३६ टेबलांवर होणाऱ्या मतमोजणीसाठी तीनशे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.