'तुमच्यासारख्या निष्पापांना त्रास देण्याचा प्रकार चुकीचा, मी कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही'; विशाळगड दंगलीवर अजितदादांचं स्पष्ट मत

Vishalgad Riots : सरकार तुमच्या पाठीशी आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही.
Deputy Chief Minister Ajit Pawar Vishalgad Riots Kolhapur
Deputy Chief Minister Ajit Pawar Vishalgad Riots Kolhapuresakal
Updated on
Summary

''शिवशाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात आपण राहतो. महाराष्ट्रात नेहमीच सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचे काम होत आहे; पण गजापूरमध्ये जे घडले ते थोडसे वेगळ्या प्रकारचे घडले.''

शाहूवाडी : गजापूर येथील नुकसानग्रस्त भागातील पीडितांनी भरपावसात आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे निर्माण झालेली व्यथा मांडली. त्यावर ‘तुमच्यासारख्या निष्पाप लोकांना त्रास देण्याचा झालेला प्रकार चुकीचा आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. संरक्षण दिले जाईल’, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना दिलासा दिला.

उपमुख्यमंत्री पवार येणार असल्याचे समजल्यानंतर काल सकाळपासून गजापूरमधील ग्रामस्थ त्यांची वाट पाहत होते. विशाळगडावरील (Vishalgad Controversy) नागरिक, महिला त्या ठिकाणी सकाळी साडेआठ वाजता आल्या होत्या. दुपारी साडेचारच्या सुमारास उपमुख्यमंत्री पवार हे गजापूर येथे आले. त्यांनी तब्बल अडीच तास या परिसरातील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली आणि तेथील नागरिक, पीडितांशी संवाद साधला.

Deputy Chief Minister Ajit Pawar Vishalgad Riots Kolhapur
Vishalgad Riots : विशाळगडावरील हिंसक आंदोलनात 2 कोटी 85 लाखांचं नुकसान; गजापुरातील बाधितांना शासनाकडून 25 हजारांची मदत

यावेळी इमान प्रभूलकर, शहीना मुजावर, शबाना मुजावर, रेश्मा प्रभूलकर, रमजान गडकर, तयब नाईक, इसूब गडकर, बाळू प्रभूलकर या नुकसानग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. ‘या घटनेमुळे भर पावसाळ्यात आम्ही बेघर झालोय. आमचं जगणं मुश्किल बनले असून, सरकारने आमची दखल घ्यावी’, अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर जिल्हा प्रशासनाने झालेल्या या घटनांची माहिती वेळोवेळी दिली आहे. आता मी स्वतः पाहणी केली आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. कायदा, नियमांच्या चौकटीत राहून सर्वांना मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांचा दौरा असल्याने पांढरेपाणी ते गजापूर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Deputy Chief Minister Ajit Pawar Vishalgad Riots Kolhapur
Vishalgad Riots : विशाळगड दंगलीचा 'मास्टर माईंड' शोधा, गजापुरात जाळपोळ-हल्ले करणारे शिवभक्त कसे? जयंत पाटलांचा सवाल

योग्य ती कारवाई केली जाईल

शिवशाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात आपण राहतो. महाराष्ट्रात नेहमीच सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचे काम होत आहे; पण गजापूरमध्ये जे घडले ते थोडसे वेगळ्या प्रकारचे घडले. निष्पाप लोकांना असा त्रास होणार नाही, ही खबरदारी घ्यायला हवी. सरकारने या घटनेची बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्या घटनेचे संपूर्ण व्हिडिओ पोलिसांनी काढलेले आहेत. त्यामध्ये कोण काय करतंय, कोणी कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, या सर्व गोष्टींची संपूर्ण शहानिशा करून त्यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

कोणत्याही समाजाने गडकिल्ल्यांवर नवीन अतिक्रमण करू नये. ज्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत. त्या ठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय करून उदारनिर्वाह करतात. त्यांची उपजीविका चालली पाहिजे आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. यादृष्टीने मार्ग काढण्यासाठी इतिहासकार, तज्ज्ञांशी सल्लामसलत करून, तसेच प्रशासन, लोकप्रतिनिधींची मते जाणून घेऊन आणि न्यायव्यवस्थेचा आदर राखून योग्य पद्धतीने मार्ग काढला जाईल.

-अजित पवार, उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.