'आवाडेंना शिव्या घातल्या नाही तर त्यांचं दुकान बंद होईल'; सुळकूड योजनेवरुन आमदारानं कोणावर साधला निशाणा?

इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न १०० टक्के मीच सोडविणार आहे.
MLA Prakash Awade Sulkud Water Scheme
MLA Prakash Awade Sulkud Water Schemeesakal
Updated on
Summary

इचलकरंजीला सुळकूडचे पाणी दिल्यास रक्ताचे पाट वाहतील, असे वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते.

इचलकरंजी : इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न १०० टक्के मीच सोडविणार असून सुळकूडचे (Sulkud Water Scheme) पाणी मीच आणणार आहे, असा दावा आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांनी केला. येथील घोरपडे नाट्यगृह चौकात झालेल्या जाहीर निश्चय सभेत ते बोलत होते.

MLA Prakash Awade Sulkud Water Scheme
Maratha Reservation : OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसं देणार? इंदूलकरांचा सरकाराला थेट सवाल

मी शहराला दररोज पाणी देण्याचे नियोजन करीत आहे आणि विरोधक पाण्याच्या प्रश्नावर केवळ राजकारण करीत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला. आमदार आवाडे म्हणाले, सुळकूड योजना शासनाने मंजूर केली आहे. त्यामुळे या योजनेतून पाणी मिळण्याचा आमचा अधिकार आहे. याबाबत फक्त मी एकटाच कधीही चर्चा करण्यास तयार आहे. विरोधकांना गोतावळा सोबत घेवून याबाबतची मात्र चर्चा करणार नाही. कारण, आवाडे यांना शिव्या घातल्या नाही तर त्यांचे दुकान बंद होईल.

MLA Prakash Awade Sulkud Water Scheme
'भारत का बादशाह टिपू सुलतान'; आक्षेपार्ह मजकुरावरून कसबा बावड्यात पुन्हा तणाव, हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक

सध्या त्यांचे दुकान सुरु आहे. पण, आंदोलन करुन प्रश्न सुटणार नाही. कृष्णा योजना करतांनाही या सर्वांनी विरोध केला. तरीही मी त्यावेळी योजना पूर्ण केली. नागरिकांचे लक्ष जाण्यासाठी त्यांची कोल्हेकुई सुरुच आहे. पण, माझी डरकाळी असणार आहे. पाणी प्रश्न मीच सोडविणार असून आता सगळे गोळा होवून राजकारण करीत बसले आहेत. लोकसभा निवडणूक लागल्यानंतर हेच सर्वजण एकत्रीत नव्हे तर एकमेकाच्या मागे पुढे दिसतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, कृष्णा योजनेची नविन जलवाहिनी टाकण्याचे व जोडण्याचे काम दीड वर्षे थांबले होते. ग्रामस्थांना विनंती केल्यानंतर हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा योजनेतून सक्षमपणे पाणी उपसा सुरु झाल्यानंतर एक दिवस आड पाणी येणार आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी एक दिवस आड शहरात नियमीत पाणी पुरवठा होईल. सुळकूड योजना झाली तरी दररोज पाणी मिळणार नाही.

MLA Prakash Awade Sulkud Water Scheme
Navratri Festival : काळा कोट, कायद्यावर बोट..! महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना 'या' नवदुर्गा ठोठावताहेत शिक्षा

कारण, पाणी साठविण्यासाठी यंत्रणा सध्या उपलब्ध नाही. त्यासाठी लवकरच सहा नवे जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. त्यानंतर शहरवासियांना दररोज पाणी मिळणार आहे. यासाठी माझा सतत पाठपुरावा सुरु आहे. मंचावर आवाडे बँकेचे अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते. ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी स्वागत केले. महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड यांनी आभार मानले.

मनपा कारभारावर प्रहार

आपल्या प्रयत्नांतून शहरात १०० शुध्दपेयजल प्रकल्प मंजूर करण्यात आले. पण, महापालिकेला हे प्रकल्प अद्यापही पूर्ण करता आलेले नाहीत. हे प्रकल्प महिन्याभरात सुरु न झाल्यास महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांना महापालिका कार्यालयातून बाहेर सोडणार नाही, असा दमही यावेळी आमदार आवाडे यांनी दिला.

MLA Prakash Awade Sulkud Water Scheme
आमदाराच्या पाहणी दौऱ्यावेळीच धमाका; उड्डाणपुलाचे 30 गर्डर खाली कोसळले, भूकंपासारखा आवाज झाल्याने नागरिकांची पळापळ

पाण्याचे पाट वाहतील

इचलकरंजीला सुळकूडचे पाणी दिल्यास रक्ताचे पाट वाहतील, असे वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. त्याला प्रत्युतर देतांना आम्ही सुळकूडचे पाणी आणण्याचा निश्चय केला असून रक्ताचे नाही तर शहरात पाण्याचे पाट वाहतील, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.

लोकसभेसाठी आदेशाची प्रतिक्षा : राहूल आवाडे

हातकणंगले मतदार संघातील खासदार हे स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून विजयी झालेले होते. मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य होतो. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे, असे राहूल आवाडे यांनी प्रास्ताविकमध्ये नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.