भाजप संविधानाच्या विरोधात काम करत आले आहे. त्यांनी इतिहास बदलण्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्रयत्न केला आहे.
कोल्हापूर : ‘ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी देण्यात येत असेल, तर सामान्य लोकांचे काय?, राज्यातील सद्यस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सामान्य लोकांची मागणी आहे. कोल्हापुरातील दंगल घडली की घडवली गेली, याचा शोध शासनाने घेणे जरुरीचे आहे’, असे आमदार रोहित पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते (Rohit Pawar) काल कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारकास अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, ‘गेल्या वर्षभरात महिलांचे अपहरण, खून, दरोडा व दंगलीचे प्रकार वाढले आहेत. चांगल्या विचारांच्या राज्यात असे घडत असेल, तर आजच्या स्थितीत लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सामान्यांची भावना आहे. कोल्हापुरातील सामाजिक सलोखा पाहिला आहे.’
ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह बेरोजगारीवर कोणी बोलत नाही. समाजात वाद कसा निर्माण करता येईल, हे पाहिले जात आहे. भाजप संविधानाच्या विरोधात काम करत आले आहे. त्यांनी इतिहास बदलण्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्रयत्न केला आहे. जे भाजपचे कार्यकर्ते संविधानाविरोधात काम करत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.’
दरम्यान, पवार यांनी अंबाबाई मंदिर, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगला भेट दिली. बिंदू चौकातील डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी विद्यापीठात जाऊन युवकांशी संवाद साधला. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचीही भेट घेतली.
‘खोट्या बातम्यांवर मोठी पदे मिळविण्यासाठी छोटे नेते निर्माण झाले आहेत. पक्ष बदलेल तसे त्यांचे वक्तव्य बदलत असते. छोट्या विचारांच्या छोट्या कार्यकर्त्यांवर कमी बोलू तेवढे चांगले आहे. मात्र, ज्येष्ठ नेते पवार यांच्यासंदर्भात चुकीचे बोलाल, तर तुमची झोप उडविल्याखेरीज राहणार नाही’, असा इशारा पवार यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.