Hasan Mushrif Samarjeetsingh Ghatge
Hasan Mushrif Samarjeetsingh Ghatgeesakal

पुढच्या वर्षी शाहू जयंतीला आमदार म्हणून येणार, ही काळ्या दगडावरची रेघ; समरजीतसिंहांचे थेट मुश्रीफांनाच चॅलेंज?

बहुजन समाजाला छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.
Summary

''माझ्या विजयात राधानगरीकरांचा मोठा हातभार असेल. कागलची चुकीची राजकीय ओळख पुसून आदर्श कागल करू.''

राधानगरी : पुढच्या वर्षी राजर्षी शाहू महाराजांची जयंती (Rajarshi Shahu Maharaj Jayanti) करण्यासाठी आमदार समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) म्हणून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. माझ्या विजयात राधानगरीकरांचा मोठा हातभार असेल. कागलची चुकीची राजकीय ओळख पुसून ''आदर्श कागल '' करू, असे शाहू उद्योग समूहाचे प्रमुख समरजीतसिंह घाटगे यांनी सांगितले. आज राधानगरी धरण स्थळावर १५० व्या राजर्षी शाहू जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत ते होते.

घाटगे म्हणाले, ‘बहुजन समाजाला छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. राधानगरी धरण (Radhanagari Dam) उभारणीच्या माध्यमातून त्यांनी हरितक्रांती फुलविली. मात्र शाहूंच्या कागलची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख पंचवीस वर्षांपासून कांहीनी हेतुपुरस्सर निर्माण केली आहे.

Hasan Mushrif Samarjeetsingh Ghatge
कर्नाटकात काँग्रेसचं सरकार धोक्यात? 'या' पदावरून पक्षात गटबाजी, DK शिवकुमारांचा प्रभाव कमी करण्यासाठी डावपेच सुरू

आजही छत्रपती शाहूंच्या नावाने व्हाट्सॲप, गुगल, विकिपीडियावर सर्च केल्यास शाहूंच्या कर्तृत्वाऐवजी केवळ येथील आरोप, प्रत्यारोप निदर्शनास येतात. आता शाहूंचा कागल अशी देशभर ओळख निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.’ शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, राजे बँकेचे चेअरमन एम.पी .पाटील, राजाराम कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगुले, बाबासाहेब पाटील, भगवानराव काटे, दत्तामामा खराडे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संभाजी आरडे यांनी केले. आभार विलास रणदिवे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com