Kirit Somaiya Visit In Kolhapur : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर झालेल्या ईडी कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.
कोल्हापुरात येऊन सोमय्या यांनी थेट हसन मुश्रीफ यांच्यासह ठाकरे गटावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला वचन दिलंय, त्यामुळं हसन मुश्रीफ प्रकरणाची चौकशी होणारच आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जी काही माफियागिरी सुरू आहे. हे आता बंद होत असून त्यांच्यावर कारवाई होत आहे. काहीजण आत गेले, काहीजण बाहेर आले तर काही जणांवर कारवाई होत आहे. यामुळं यांच्याशी लढण्यासाठी मला शक्ती मिळावी यासाठी मी अंबाबाई चरणी आलो आहे, असं सोमय्या म्हणाले.
सोमय्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याकडं सर्वांचं लक्ष वेधलं. 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबाच्या खात्यात का आले? याच उत्तर द्या. रजत कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अस्तित्वात नसताना हे पैसे आले. बंद पडलेल्या कंपन्यांमधून खात्यात पैसे कसे येतात हे कोल्हापूरकरांना कळू द्या. हे पैसे कसे आले हे कळलं तर कोल्हापूरकर आयुष्यभर नव्हे सात जन्म नमस्कार करतील, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला.
गेल्यावेळी मी अंबाबाईच्या दर्शनाला येत होतो. मात्र, त्यांनी मला अडवलं होतं. आता हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचं इन्कम टॅक्स यांच्याकडून कारवाई होत आहे. हसन मुश्रीफ म्हणाले होते, भाजप आणि किरीट सोमय्या यांच्याकडून मुस्लिम धर्मातील माझ्यावर नवाब मलिक आणि अस्लम शेख यांच्यावर कारवाई करत आहेत म्हणून आता मुश्रीफ यांना धर्म आठवू लागला आहे. त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी आता देखील सोमय्या यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही, असं म्हटलं होतं. मात्र, आता राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही. उद्धव ठाकरे यांनी हातातला भगवा सोडून हिरवा पकडला होता, म्हणून तुम्ही मला अडवू शकलात. मात्र, आता भाजपचं सरकार आहे आडवून दाखवा, असं आव्हानही त्यांनी यावेळी दिलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.