Kagal Politics : समरजित घाटगे भाजपची साथ सोडणार? मुश्रीफांच्या मंत्रिपदाने नाराज; आज जाहीर करणार भूमिका

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आज कागलमध्ये कार्यकर्त्यांसमोर या विषयाबद्दल आपली भूमिका सांगणार आहेत.
Hasan Mushrif vs Samarjit Singh Ghatge
Hasan Mushrif vs Samarjit Singh Ghatgeesakal
Updated on
Summary

भाजप सरकारमध्ये आमदार मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री झाल्याने समरजित घाटगे यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

कागल : आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची शिंदे-फडणवीस-पवार मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर नाराज होऊन नॉटरिचेबल झालेले भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आज, गुरुवारी कागलमध्ये कार्यकर्त्यांसमोर या विषयाबद्दल आपली भूमिका सांगणार आहेत.

Hasan Mushrif vs Samarjit Singh Ghatge
Radhanagari : हसन मुश्रीफांचा 'दोस्त' कोणाला साथ देणार? साहेब की दादा, 'केपीं'च्या राजकीय भूमिकेकडं लक्ष्य

बुधवारी त्यांनी (Samarjeet Ghatge) मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन नाराजी त्यांच्यासमोर मांडली आहे. सकाळी दहा वाजता गैबी चौकाजवळील कागल ज्युनिअर वाड्याच्या पटांगणात हा संवाद साधणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतरही त्यांनी विरोधी पक्षाची ठाम भूमिका घेत भाजप जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली. शिंदे, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना कोणते तरी पद मिळेल अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सामील होऊन सत्तेचा वाटेकरी झाला आहे.

Hasan Mushrif vs Samarjit Singh Ghatge
NCP Crisis : राष्ट्रवादीत आधे इधर, आधे उधर; 'या' आमदाराच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण

समर्थक संतप्त

भाजप सरकारमध्ये आमदार मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री झाल्याने समरजित घाटगे यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांना आपली भूमिका सांगणार आहेत. समाजमाध्यमावर त्यांनी हे सांगताना आपण कुटुंबातील सदस्यांशी याबद्दल चर्चा केली आहे, असेही म्हटल्याने ते काय सांगणार याची उत्सुकता आणखीन वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.