आवाडे यांनी हाळवणकर यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यांनी याकडे दुर्लक्ष केले. याची चर्चा घटनास्थळी होती.
इचलकरंजी : ‘जेवणापासून ते उत्तम जीवन जगण्यापर्यंत तसेच आरोग्यापासून तीर्थाटनापर्यंत मोदी सरकारने नागरिकांना विविध सोयीसुविधा अनेकविध योजनांतून दिल्या. महायुती सरकारने बांधकाम कामगारांना घरगुती भांड्यांचा सेट दिला. मात्र काँग्रेसच्या (Congress) काळात साधा चमचाही मिळाला नाही. काँग्रेसने केवळ सत्तेचा बाजार करून संपत्ती वाढवण्याचे काम केले. अशा लबाड बोलणाऱ्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवा आणि विधानसभेला इचलकरंजीत भाजपच्या (BJP) उमेदवाराला भरभरून आशीर्वाद द्या’, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केले.
संजय गांधी निराधार योजनेच्या वतीने (Sanjay Gandhi Niradhar Yojana) श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात आयोजित संजय गांधी निराधार योजनेच्या दोन हजार ३०० मंजूर लाभार्थ्यांना पत्रवाटप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मंजूर लाभार्थ्यांना पत्रांचे वाटप करण्यात आले. व्यासपीठावर माजी खासदार निवेदिता माने, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, डॉ. राहुल आवाडे, अमृत भोसले, प्रकाश दत्तवाडे, अपर तहसीलदार सुनील शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
हाळवणकर म्हणाले, ‘महायुती सरकार लाडक्या बहिणींचे आहे. मात्र सावत्र भाऊ बदनामी करत आहेत. हे गरिबांचे सरकार आहे.’ इचलकरंजीत संजय गांधी योजनेचे ३३ हजार लाभार्थी असून माझ्या कार्यकाळात नवीन ११ हजार लाभार्थ्यांची पेन्शन मंजूर झाल्याचे समितीचे अध्यक्ष ॲड. अनिल डाळ्या यांनी सांगितले. सुखदेव माळकरी, कोंडीबा दवडते, संजय नागोरे, तमन्ना कोटगी, जयप्रकाश भगत, सलीम मुजावर, सरिता आवळे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
राहुल आवाडे यांनी संजय गांधी योजनेतून आपल्या सामाजिक कामाची सुरुवात झाल्याचे सांगत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप प्रवेशापर्यंत सर्वकाही अत्यंत पोटतिडकीने मांडले. त्यानंतर माजी खासदार निवेदिता माने बोलताना म्हणाल्या, ‘राहुल आवाडे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच विधानसभा निवडणुकीत इचलकरंजीचे स्वयंघोषित उमेदवार असल्यासारखे भाषण केले.’
सुरेश हाळवणकर व्यासपीठावर बसले होते. मात्र, राहुल आवाडे व्यासपीठावर आल्यानंतर हाळवणकर आणि हिंदूराव शेळके हे दोघेही उठले. आवाडे यांनी हाळवणकर यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यांनी याकडे दुर्लक्ष केले. याची चर्चा घटनास्थळी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.