खासदार धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिकांची राजकीय एन्ट्री; कोल्हापुरात झळकले बॅनर, विधानसभा लढवणार?

कृष्णराज हे विधानसभा लढवणार की अन्य कोणती निवडणूक (Assembly Elections) लढवणार याविषयी उत्सुकता आहे.
Dhananjay Mahadik son Krishnaraj Mahadik
Dhananjay Mahadik son Krishnaraj Mahadikesakal
Updated on
Summary

प्रसिध्दीपासून अलिप्त राहिलेले कृष्णराज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या फलकामुळे प्रसिध्दझोतात आले आहेत.

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांसाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा करत शहरभर डिजिटल फलक लावून जिल्ह्याच्या राजकारणात येण्याचे संकेत खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे पुत्र कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांनी दिले आहेत. २५ तारीख, २५ कोटी आणि २५ वा वाढदिवस अशी ‘थीम’ घेऊन लागलेल्या या फलकांची शहरात चर्चा आहे.

Dhananjay Mahadik son Krishnaraj Mahadik
Loksabha Election : उदयनराजेंनी वाढदिनी फुंकले रणशिंग; लोकसभेला जनतेतून निवडून जाण्याची व्यक्त केली इच्छा

दरम्यान, या फलकबाजीवरून कृष्णराज हे विधानसभा लढवणार की अन्य कोणती निवडणूक (Assembly Elections) लढवणार याविषयी उत्सुकता आहे. कोल्हापूर उत्तर किंवा दक्षिण मतदारसंघातून ते विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता यावरून वर्तवली जात आहे.

जागतिक पातळीवर कार रेसिंगमध्ये वेगळा ठसा उमटवलेले कृष्णराज सोशल मीडियावर चांगले प्रसिध्द आहेत. लाखो तरूण समाज माध्यमांवर त्यांचे फॉलोअर्स आहेत. ‘महाडिक पॅटर्न’ या युट्यूब चॅनेलवरून त्यांच्याकडून कौटुंबिक किस्सेही शेअर केले जातात. त्यातून ते राज्यभर प्रसिध्द आहेत. यातून मिळणारे उत्पन्न ते समाज कार्यासाठी खर्च करतात.

Dhananjay Mahadik son Krishnaraj Mahadik
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं 10 टक्के आरक्षण दिलं - एकनाथ शिंदे

प्रसिध्दीपासून अलिप्त राहिलेले कृष्णराज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या फलकामुळे प्रसिध्दझोतात आले आहेत. त्याला कारण आहे त्यांच्या पुढाकारातून शाहू स्टेडीयमवर सुरू असलेली मोठ्या बक्षिस रक्कमेची फुटबॉल स्पर्धा. या स्पर्धेचे फलकही शहरभर झळकले आहेत. त्यानंतर त्यांनी २५ फेब्रुवारीला एक वेगळी भेट कोल्हापूरकारांसाठी देणार असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याचीही उत्सुकता होती.

Dhananjay Mahadik son Krishnaraj Mahadik
..अन् क्षणात त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा! 'वनरक्षक'ची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या युवकाचा कार अपघातात मृत्यू

त्यातून काल दिवसभर एकाचवेळी शहराच्या विविध भागात त्यांच्या प्रयत्नातून शहरातील रस्त्यासाठी २५ कोटी निधी आणल्याचे फलक लागले आहेत. या फलकावरील कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. या निधीसाठी आपण काय काय केले, कोणाची भेट घेतली त्याचाही एक त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मागोवा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()