Kolhapur : काँग्रेस उमेदवारांवर छाप्यांची भाजपची तयारी!

सुरजेवाला : मोदींनी उपसले शेवटचे हत्यार
रणदीप सुरजेवाला
रणदीप सुरजेवालाsakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रीय यंत्रणांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे नेते आणि उमेदवारांविरोधात छापे घालण्यासाठी रवाना केले असल्याचा दावा काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी केला.

निवडणुकीसाठी स्वतःचे उमेदवार निवडण्यात भाजप अपयशी ठरली आल्याची खात्रीशीर माहिती आमच्या पक्षाकडे आहे, असा दावा करीत ते म्हणाले निवडणूक होण्याऱ्या राज्यांमध्ये भाजपमधील नेते सामूहिक पातळीवर पक्ष सोडून चालले आहेत.

रणदीप सुरजेवाला
Kolhapur: बागेवाडीत दोन कोटी रोकड जप्त!

कर्नाटकमध्ये भाजप उमेदवारांची निवड करू शकत नाही आणि दुसरीकडे भाजपचे मंत्री आणि आमदार निवडणूक लढविण्यास नकार देत आहेत. कर्नाटकमध्ये भाजपमधून सामूहिकरीत्या लोक पक्ष सोडून जात आहे. सुमारे दहा आमदार, विधान परिषद सदस्य, माजी आमदार, विधान परिषदेचे माजी सदस्य तसेच त्यांची मंडळे आणि महामंडळांचे डझनभर अध्यक्ष राजीनामा देत आहेत आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत.

`‘पंतप्रधान मोदी यांनी त्यामुळेच त्यांचे शेवटचे हत्यार उपसले आहे. पण तेदेखील अयशस्वी होईल. आमच्याकडील माहितीनुसार प्राप्तीकर आणि सक्तवसुली संचालनालयाच्या शेकडो अधिकाऱ्यांना कर्नाटकात पाठविण्यात आले आहे.

राज्यातील काँग्रेसचे नेते, उमेदवार आणि संभाव्य उमेदवारांवर छापे घालण्याचा हेतू त्यामागे आहे,’’ असा आरोप सुरजेवाला यांनी केला. काँग्रेस पक्ष कोठेही कमी पडणार नाही आणि पूर्ण शक्तीने निवडणूक लढवेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

रणदीप सुरजेवाला
Kolhapur : ‘मेन राजाराम’ला विशेष ग्रँट देणार!

‘सत्तेवर येण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला त्यांचे खोटे, फसवे आणि बनावट छापे काँग्रेसला अडवू शकणार नाहीत करणार नाहीत, हे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या ‘ईडी’ आणि ‘आयटी’ने लक्षात ठेवावे, असे सांगत पक्षाला निवडणुकीत १५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा सुरजेवाला यांनी केला.

जनतेचा ‘रथ’ असलेल्या काँग्रेसच्या ‘रथा’ला भाजपचा प्राप्तीकर आणि ‘ईडी’ विभाग अडवू शकत नाही. भाजप सरकारच्या वतीने तुम्ही केलेल्या सर्व गैरकृत्यांचा हिशेब ठेवला जाईल, हे सर्व नोकरशहा आणि ‘आयटी’, ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे.

- रणदीप सुरजेवाला, खासदार, काँग्रेस

कर्नाटकात काँग्रेसची लाट येणार असून पक्ष बहुमताच्या जोरावर सत्तेवर येईल. राज्यात भाजप रसातळाला जात आहे आणि पक्ष सत्तेवर येणार नाही, याची जाणीव भाजपच्या पक्षश्रेष्ठींना आहे. कर्नाटकमधील यंदाच्या निवडणुकीत द्वेषाचे राजकारण आणि हिंदुत्वाचा मुद्दा फलदायी ठरणार नाही.

- सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री, कर्नाटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.