'दार उघड उद्धवा!; मंदिरे उघडण्यासाठी 'भाजप'चे शंखनाद आंदोलन

'दार उघड उद्धवा!; मंदिरे उघडण्यासाठी 'भाजप'चे शंखनाद आंदोलन
Updated on
Summary

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाद्वार चौकात एकत्र येऊन बंद अंबाबाई मंदिरासमोर घोषणाबाजी केली.

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीने (BJP) महाद्वार चौकामध्ये ‘मंदिरे उघडा’ यासाठी शंखनाद आंदोलन केले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाद्वार चौकात एकत्र येऊन बंद अंबाबाई मंदिरासमोर घोषणाबाजी केली. ‘मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा! धुंद तुझे सरकार’, ‘धार्मिक स्थळे सुरु करा’, 'दार उघड उद्धवा, दार उघड', अशा आशयाचे फलक घेऊन घोषणा दिल्या. यावेळी प्रवक्ते धनंजय महाडिक, (dhanjay mahadik) प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई प्रमुख उपस्थित होते. (bjp shankhnaad protest in kolhapur)

देसाई म्हणाले, 'मंदिरे उघडण्यासाठी यापूर्वी आंदोलन केले. सरकारने महसूल गोळा करण्याच्या हेतूने मद्यालये सुरू केली; मात्र धार्मिक स्थळांवर अजून निर्बंध घातले आहेत. मंदिरे बंद असल्यामुळे पर्यटन बंद असून मंदिराच्या सभोवती असणाऱ्या अनेक लहान-मोठ्या घटकांवर परिणाम झाला आहे.' (kolhapur update)

'दार उघड उद्धवा!; मंदिरे उघडण्यासाठी 'भाजप'चे शंखनाद आंदोलन
कातळांवर फुलले नंदनवन; ‘कास पठारा’ची अनुभूती

जाधव म्हणाले, 'दीड वर्षापासून मंदिरे बंद आहेत; परंतु बार, हॉटेल हे सुरु झाले. मग मंदिरे बंद का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अंबाबाई मंदिरा बाहेर छोटे साहित्य विकणारी दुकाने, खाद्य दुकाने यांची उपजीविका या मंदिरावर अवलंबून आहे. या सरकारला विनंती आहे की, लवकर अंबाबाई मंदिरासह अन्य मंदिरांचे दरवाजे उघडावेत जेणेकरून भक्तांना देवीचे दर्शन घडावे. मंदिरावर उपजीविका असणाऱ्या व्यवसायिकांना दिलासा द्यावा.'

यावेळी चिकोडे म्हणाले, 'सरकारमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादीची मंदिरे बंद असल्याबाबत आम्ही भूमिका समजू शकतो; पण ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली, हिंदुत्ववादी पक्ष म्हणणाऱ्या पक्षाचे उद्धव ठाकरे सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत. अशावेळी हिंदू धर्मीयांची अध्यात्मिक क्षेत्र बंद ठेवून ठाकरे सरकारला काय मिळवायचे आहे? आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे की, राज्यातील सर्व धर्मीयांची अध्यात्मिक क्षेत्र, मंदिरे उघडा; अन्यथा उग्र आंदोलन करून या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही.'

'दार उघड उद्धवा!; मंदिरे उघडण्यासाठी 'भाजप'चे शंखनाद आंदोलन
आता राधानगरी, दाजीपूर 'जंगल बस सफारी' 300 रुपयात

यानंतर गणेशाची, देवीची आरती केली

मारुती भागोजी, चंद्रकांत घाडगे, सचिन तोडकर, अजित ठाणेकर, प्रमोदिनी हर्डीकर, प्रदीप उलपे, अजित सूर्यवंशी, विजय खाडे, गायत्री राउत, विद्या बागडी, राधिका कुलकर्णी, विजयमाला जाधव, सुनिता सूर्यवंशी, कोमल देसाई, सुजाता पाटील, मंगल निप्पाणीकर, चिनार गाताडे, अशोक लोहार, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी, डॉ. राजवर्धन, भरत काळे, रविंद्र मुतगी, अभिजित शिंदे, संदीप कुंभार, विराज चिखलीकर, नजीर देसाई, योगेश साळोखे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, विक्रेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.