‘ब्लास्टोसिस्ट’ ही गर्भाची सर्वात परिपक्व अवस्था असते. व अशा गर्भाचे रोपण मातेच्या गर्भाशयात केल्यास उपचारांची यशस्विता वाढू शकते.
कोल्हापूर : वंध्यत्वावर मात करण्यासाठी जगभरात सध्या ‘ब्लास्टोसिस्ट आयव्हीएफ’ हे तंत्रज्ञान प्रचलित आहे. मात्र, हेच तंत्रज्ञान २५ वर्षांपूर्वी येथील पत्की हॉस्पिटलमध्ये (Patki Hospital) उपलब्ध होते. येथे जन्मलेली पहिली ब्लास्टोसिस्ट आयव्हीएफ बेबी (Blastocyst IVF Baby) आज (शुक्रवारी) पंचवीसाव्या वर्षांत पदार्पण करणार आहे. २३ ऑगस्ट २००० रोजी सुगंधा व सुधाकर बेर्डे या मुंबईच्या दांपत्याला लग्नानंतर वीस वर्षांनी हे कन्यारत्न प्राप्त झाले.