तपासामध्ये ही आत्महत्या नसून, खून असल्याचे उघड झाल्याने मृताची पत्नी व तिचा प्रियकर विजय खोत या दोघांवर कागल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोल्हापूर : अनैतिक संबंधांतून प्रेयसीच्या (Girlfriend) पतीचा खून करणाऱ्या विजय ऊर्फ गंभीर संभाजी खोत (वय ३२, रा. कागल) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २४ सप्टेंबर २०१८ रोजी मृताने आत्महत्या केल्याचे भासविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मृताच्या पत्नीने प्रियकर विजय खोतच्या मदतीने खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याने दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.