पन्हाळगडाचा रस्ता खचला; प्रवासी करनाक्यावरचा अर्धा भाग दरीत

रस्ता दोन दिवसांपासून खचू लागल्याने गडावर येण्याचा मार्गच बंद झाला आहे.
पन्हाळगडाचा रस्ता खचला; प्रवासी करनाक्यावरचा अर्धा भाग दरीत
Updated on

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगड (panhala fort) रस्ता खचल्याने आज दुसऱ्या वेळी हा रस्ता पुन्हा बंद झाला आहे. (breaking news) २०१९ साली रेडे घाट आणि मार्तंड परिसरात पाण्याच्या प्रवाहामुळे खालून माती घसरून गडावर येणारा गुरुवार पेठ जवळचा रस्ता खचला होता. (landslide) आज सकाळी साडेसहा वाजता गडावरील चार दरवाजा येथील जुना नाका ते जुना १८८८ साली बांधलेला संरक्षक कठड्यापर्यंतचा रस्ता उताराच्या बाजूने मंगळवार पेठेत घसरला. (kolhapur rain update)

पन्हाळगडाचा रस्ता खचला; प्रवासी करनाक्यावरचा अर्धा भाग दरीत
राधानगरी - कोनोलीत भूस्खलनामुळे घर गाडले; 2 जण दगावल्याची शक्यता

वीजेच्या डीपीसह तटबंदीच्या जुन्या बांधकामसह सार्वजनिक बांधकाम खात्याने अलिकडच्या काळात बांधलेल्या कठड्यासह निम्मा रस्ता खचल्याने गडावर येण्याचा प्रमुख मार्ग बंद झाला आहे. साधोबा तलावाचे पाणी आणि गडावरील ड्रेनेजसह पावसाच्या पाण्यामुळे दोन वर्षांपूर्वी खिळखिळा झालेला परिसर घसरला आहे. गडावर येण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तीन दरवाजातील मार्गाचा वापर होत होता. पण तोही रस्ता दोन दिवसांपासून खचू लागल्याने गडावर येण्याचा मार्गच बंद झाला आहे. साहजिकच आता बुधवार पेठ ते पन्हाळा नाका हा उड्डाणपूल गरजेचा बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.