जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळं सख्ख्या भावांना पोलिस दलातून केलं सेवामुक्त; आरक्षणातून मिळाली होती नोकरी

Kolhapur Police Force : उपनिरीक्षक महेश शिंदे हे सप्टेंबर १९९१ ला, तर विष्णू शिंदे हे ऑगस्ट २००४ ला भटक्या जमाती ‘ब’ वर्गातून भरती झाले होते.
Kolhapur Police Force
Kolhapur Police Forceesakal
Updated on
Summary

भरती वेळी त्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले होते. त्याआधारे त्यांना आरक्षणातून नोकरी मिळाली होती.

कोल्हापूर : जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे विभागीय चौकशी अहवालानंतर दोघा सख्ख्या भावांना पोलिस दलातील (Police Force) सेवेतून मुक्त केले. पोलिस उपनिरीक्षक महेश रमेश शिंदे आणि पोलिस नाईक विष्णू रमेश शिंदे अशी त्यांची नावे आहेत. याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.