जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी पोहाळेजवळ ही लेणी जांभा दगडातील आहे. यामध्ये चैत्य स्तूप विहार असून, बौद्ध भिक्षूंसाठी खोल्या आहेत.
कोल्हापूर : लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, खडक कोरून तयार केलेल्या गुहा. याचा उपयोग बौद्ध भिक्षुंना तपस्या, साधना करण्यासाठी तसेच विश्रांती घेण्यासाठी ध्यानस्थ बसण्यासाठी व सभा घेण्यासाठी होत होता. तत्कालीन संस्कृतीचा, बौद्ध परंपरेचे हे प्रतिबिंब नव्या पिढीला कळावे, यासाठी कोल्हापुरातील युवा बौद्ध धम्म परिषद Yuva (Buddhist Dhamma Parishad) प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध लेण्यांचे दर्शन घडविण्यासाठी संस्थेतर्फे दरवर्षी तीन - चार सहलींचे (Trip) आयोजन केले जाते. या माध्यमातून बौद्ध शिकवणीचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.
जिल्ह्यात मसाई पठार, कुशिरे - पोहाळे, पळसंबे (ता. गगनबावडा) तसेच सांगली जिल्ह्यातील गिरीलिंग डोंगर येथील बौद्ध लेणींचा (Buddhist Caves) अभ्यास करण्यासाठी परिषद विविध उपक्रमांचे आयोजन करते. मसाई पठाराच्या उत्तरेस बौद्धकालीन लेण्या आहेत. सम्राट अशोकाच्या काळात भारतात बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. त्यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध प्रचारक भिक्षु कोल्हापूर परिसरात होते. पन्हाळागड जवळच्या मसाई पठारावर इंजोळे गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील गर्द झाडी असलेल्या डोंगरमाध्यावरील कड्यात खोदलेली लेणी इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील असावी असे अभ्यासकांचे मत आहे.
लेणीच्या बाहेर उथळ कोनाड्यांमध्ये अर्ध उठावदार स्तूप अस्पष्ठ कोरलेले दिसतात. या लेणीत ८ कक्ष, खंडित स्तूप आहे. येथे धार्मिक शिक्षण दिले जात होते. जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी पोहाळेजवळ ही लेणी जांभा दगडातील आहे. यामध्ये चैत्य स्तूप विहार असून, बौद्ध भिक्षूंसाठी खोल्या आहेत. मध्यभागी मोठे सभागृह आहे. डाव्या बाजूला २ नैसर्गिक पाण्याचे झरे असून याच्या उजव्या बाजूला २ खोल्या आहेत. लेणीत प्रचंड गारवा जाणवतो. बौद्ध भिक्षेसाठी कोरलेल्या या लेणी एके काळी शिक्षण देण्याचे महत्वाचे केंद्र होते. पिण्याच्या पाण्याची विहीरही आहे.
गगनबावडा येथील पळसंबे लेणी वाकाटक काळामध्ये कोरल्या आहेत. येथे तीन एका दगडात कोरलेली मंदिरे अर्थात विहारे आढळतात. त्या ठिकाणी साधारणता ७ बाय ७ आकाराची विहार आहे त्याच्यामध्ये एकच माणूस बसावा, अशा प्रकारची बैठक व्यवस्था आहे. लेण्यांची अशी दुर्लक्षित असलेली माहिती नव्या पिढीसमोर येण्यासाठी युवा बौद्ध धम्म परिषदेतर्फे संस्थापक किरण भोसले, राज्याध्यक्ष डॉ. संतोष भोसले, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राजहंस अभ्यास करत आहेत.
युवा बौद्ध धम्म परिषद ही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कार्यरत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शिल्प संशोधन संस्थेसोबत त्यांचे काम चालते. महाराष्ट्रातील विविध लेण्यांचा अभ्यास केला जातो. ही माहिती नव्या पिढीला कळावी, यासाठी सहलींचेही आयोजन केले जाते.
-डॉ. संतोष भोसले, राज्याध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.