विषय हार्ड! राधानगरीत रंगली चिखलगुठ्ठा स्पर्धा

विषय हार्ड! राधानगरीत रंगली चिखलगुठ्ठा स्पर्धा
Updated on

धामोड : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथे विनापरवाना बैलांच्या चिखलगुठ्ठा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी रोख रकमेसह विविध बक्षिसे ठेवण्यात आली होती. आयोजकांनी सोशल मीडियावर स्पर्धेची जाहिरात केल्याने स्पर्धा पाहण्यासाठी हजारो शर्यत शौकीनांनी येथे हजेरी लावली. बैलगाडी शर्यतीवर न्यायालयाची बंदी असताना स्पर्धा घेतल्याने आयोजकांवर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

विषय हार्ड! राधानगरीत रंगली चिखलगुठ्ठा स्पर्धा
'विरोधकांनी नाकारले तरी 'चिपी'चे संपूर्ण श्रेय केंद्रीयमंत्र्यांनाच'

राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरामध्ये शेतीची सर्व कामे आटोपली आहेत. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात परिसरातील गावांमध्ये चिखलगुठ्ठा स्पर्धेचे आयोजन केले जाते. केळोशी बुद्रुक येथे बेकायदेशीर चिकलगुठ्ठा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेण्यात आलेली नाही. स्पर्धेसाठी रोख रकमेसह विविध बक्षिसे ठेवण्यात आली होती. आयोजकांनी या स्पर्धेचे जाहिरात सोशल मीडियावरून केली. त्यामुळे रविवार (२६) रोजी हजारो शर्यत शौकिनांनी स्पर्धेच्या ठिकाणी गर्दी केली.

विषय हार्ड! राधानगरीत रंगली चिखलगुठ्ठा स्पर्धा
"भारताशिवाय दहशतवाद, तापमानवाढ, लोकसंख्यावाढ यांवर तोडगा अशक्य"

कोरोना संकट असतानाच सोशल डिस्टिंक्शन आणि विनामास्क शर्यत अनेक शोकिन स्पर्धेच्या ठिकाणी फिरत होते. सोशल मीडियावर या स्पर्धेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. बैलगाड्यांच्या शर्यतीवर सरकारने बंदी घातली आहे. मुक्या जनावरांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारामुळे व विनापरवाना ही स्पर्धा घेतल्याने येथील आयोजकांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू आहे. याबाबत राधानगरीचे एपीआय डोईजड यांना विचारले असता ते म्हणाले, 'केळोशी बुद्रुक येथे विनापरवाना चिखलगुट्टाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. येथील आयोजकांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.