Covid Impact : कोल्हापूर, साताऱ्याला जाणाऱ्या कर्नाटकच्या गाड्यांना 'ब्रेक'

Belgaum Transport Corporation
Belgaum Transport Corporationesakal
Updated on

बेळगाव : कर्नाटकच्या बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूर आणि सातारा (Kolhapur and Satara) जिल्ह्याकडे जाणाऱ्या बसेसना बेळगाव परिवहनकडून 'ब्रेक' देण्यात आलाय. कारण, महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये कोविडच्या (Coronavirus) घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. आधीच तोट्यात चालणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बेळगाव आगाराला (Belgaum Transport Corporation) आता परत अजब आदेशांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कोरोना विषाणूच्या डेल्टा संसर्गामुळे (Delta Plus Variant) महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा व अन्य कांही जिल्ह्यात निर्बंध लागू केल्यामुळे कोल्हापूर आणि सातारा ही बस सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातील बस सुरु राहणार आहे. (Buses From Belagavi To Kolhapur Satara Stopped Karnataka Marathi News)

Summary

कर्नाटकच्या बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूर आणि सातारा (Kolhapur and Satara) जिल्ह्याकडे जाणाऱ्या बसेसना बेळगाव परिवहनकडून 'ब्रेक' देण्यात आलाय.

कर्नाटक सरकारने राज्यात प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रवासीयांसाठी यापूर्वीच आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR Test) बंधनकारक केलीय. आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी निगेटिव्ह असली, तरच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. येथील कोगनोळी चेक पोस्ट नाक्यावर कर्नाटक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. बेळगाव बसस्थानकातून दररोज 200 हून अधिक बसेस महाराष्ट्रात येतात. सीमाभागातील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील रहिवासी जे वारंवार राज्यांमध्ये प्रवास करतात, त्यांना बससेवा ठप्प झाल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

Belgaum Bus
Belgaum Bus
Belgaum Transport Corporation
ऐंशीच्या दशकात निपाणीतील 'रक्तरंजित क्रांती', पोलीस- शेतकरी संघर्षाची कहाणी

महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे कर्नाटकने बेळगावातून कोल्हापूर आणि साताराकडे जाणारी बससेवा सोमवारपासून (ता. 28) बंद केलीय. वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने North West Karnataka Road Transport Corporation (nwkrtc) खबरदारी म्हणून कोल्हापूर व सातारा जिल्ह्याची बस सेवा बंद केली आहे. कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे लोक घाबरून गेले आहेत. नवीन डेल्टा प्रकार सर्वात वेगवान पसरणारा व्हायरस आहे. अशा परिस्थितीत आपल्याला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून लोकं सावरत असतानाच कोविडच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटने भारतात हातपाय पसरायला सुरुवात केलीय. हा नवीन डेल्टा प्लस व्हायरस झपाट्याने पसरत आहे. नवीन डेल्टा प्लसची बऱ्याच केसेस महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि मध्य प्रदेशात आढळल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये एकामागून एक संकट आल्याने भितीचं वातावरण दिसून येत आहे.

Belgaum Transport Corporation
सातारा-सोलापूर रेल्वेसाठी खासदार उदयनराजेंना साकडे

महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांनी, कोल्हापुरातील पोलीस अधिकाऱ्यांना कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी चौक्यांची स्थापना करण्याचे आदेश दिलेत. ते म्हणाले, महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल, तर आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक असून राज्यात येण्यासाठी किमान एकतरी डोस घेतलेला असावा. सध्या कोल्हापुरात वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. रत्नागिरीसारख्या कोकण जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशासाठी आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे. कारण, नवीन डेल्टा-प्लस प्रकारात संसर्ग झालेल्या कोविड रूग्णांची नोंद रत्नागिरीत झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Buses From Belagavi To Kolhapur Satara Stopped Karnataka Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.