वासराच्या उपचारासाठी आईची घालमेल ; मदतीसाठी धावला बोरवडेचा अक्षय

Boravde
Boravdesakal
Updated on

बिद्री (कोल्हापूर) : मुधाळ तिट्टा ( ता.कागल ) येथे आठ दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भटक्या गाईच्या एक महिने वयाच्या वासराचा पुढील बाजूचा पाय मोडला. अशा अवस्थेत हे वासरु रस्त्याकडेला दोन दिवस वेदना सहन करत बसून होते. येणारे जाणारे लोक या वासराला पाहून हळहळ व्यक्त करायचे परंतू कोणालाही त्याच्याबद्दल दया येत नव्हती. अशावेळी बोरवडे येथील ओंकार चव्हाण याच्या नजरेस ते वासरु पडले आणि आपण त्या वासरासाठी काहीतरी केले पाहिजे अशी दयेची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. त्याने खाजगी पशुवैद्यकांच्या मदतीने त्या वासरावर उपचार केले. उपचारानंतर ते वासरु लंगडत का असेना चालू लागल्यावर उपस्थित तरुणांच्या चेहऱ्यावर आपण केलेल्या कामाचे समाधान दिसत होते.

मुधाळ तिट्टा परिसरात देवास सोडलेल्या भटक्या गाईंचा कळप आहे. या गाई अनेकवेळा मुख्य चौकात उभा असतात. त्या कधीही रस्ता पार करतात. त्यामुळे बऱ्याचदा त्या वाहनांच्या अचानक आडव्या येतात. मागील आठवड्यातही हा कळप रस्ता पार करित असताना त्यातील एक महिने वयाच्या वासराला अंदाज न आल्याने, रस्त्यावरुन जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली.ही धडक जोरदार असल्याने त्या वासराचा पुढील बाजूचा डावा पाय मोडला, तर इतर ठिकाणीही किरकोळ जखमा झाल्या. वेदनेने विव्हळणारे ते वासरु रस्त्याकडेलाच बसुन राहिले, तर ठोकरणाऱ्या वाहनधारकांने त्या वासराची चौकशी न करताच तो तसाच पुढे निघुन गेला.दोन दिवस वेदना सहन करणाऱ्या त्या वासराला उपचाराची गरज असताना, येणारे जाणारे लोक या वासराला पाहून हळहळ व्यक्त करायचे. परंतू त्याच्यावर उपचार करण्याचे कोणाच्याच मनात आले नाही.

Boravde
चाकू, अडकित्याचा धाक दाखवत खंडणी उकळण्याचा प्रकार

बोरवडेतील युवक ओंकार चव्हाण याच्या दृष्टीस हे वासरु पडताच, त्याच्या मनात वासराबद्दल करुणा निर्माण झाली. त्याने विलंब न करता आपल्या मित्रांच्या मदतीने त्या वासराच्या पायावर उपचार करण्यासाठी सरवडेतील डॉक्टर रंगराव पाटील यांना बोलावून आणले आणि त्या वासराचा पाय बांधला.तसेच डॉ. विनायक जगदाळे यांनी त्या वासरास इंजेक्शन देत, ते वासरु बरे होईपर्यंत लागणारे संपूर्ण उपचार मोफत करण्याचे जाहीर केले.या वासरावर उपचार करण्यासाठी सन्मित्र तरुण मंडळाचे अध्यक्ष ओंकार चव्हाण, सोहम डाफळे,ऋतुराज चव्हाण, रोहित डाफळे,ऋषीकेष चव्हाण, विरकुमार चव्हाण,रविंद्र कुंभार, अजय केसरकर,गणेश डाफळे, अर्जुन चव्हाण,तेजस चव्हाण, अक्षय बलुगडे,अनंत पोवार, अमेय साठे यांचे सहकार्य मिळाले.

वासरावर उपचार आणि गाईची घालमेल

जखमी वासराचा पाय बांधण्यासाठी जेंव्हा हे तरुण त्याच्याजवळ गेले तेंव्हा शेजारी त्याची आई होती. तरुणांनी वासराजवळ जाण्याचा प्रयत्न करताच ती त्यांच्या अंगावर धावून येत होती. तरुणांनी बराच वेळ प्रयत्न करुन त्या गाईला वासरापासून दूर केले आणि मग त्याच्यावर उपचार केले. पाय बांधून झाल्यावर गाय धावत आपल्या लेकराजवळ येऊन मायेनं चाटु लागली. त्यावेळी हे दृश्य पाहून सन्मित्र मंडळातील तरुणांच्या चेहऱ्यावर एकच समाधान दिसत होते. रस्त्यावरुन जाणारे प्रवाशी हे दृश्य पाहून त्या तरुणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.