केंद्र सरकारने आजच या संदर्भातील अधिसूचना जारी केली. ‘मसुदा साखर (नियंत्रण) आदेश २०२४’ या नावाने हा मसुदा प्रसिद्ध केला आहे.
कोल्हापूर : साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) साखर नियंत्रण कायद्यात (Sugar Control Act) बदल करणार असून संभाव्य बदलांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर साखर उद्योगांकडून २३ सप्टेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. यात साखरेचा दर ठरवणे, अन्य उपपदार्थांचा समावेश, खांडसरी उद्योगातील बदल, साखर पॅकिंग या संदर्भातील बदलांचा समावेश आहे.