सासरा-जावयास एकाच वेळी मिळाला केंद्रीय पोलिस पदकाचा 'हा' मान

Central Medal awarded 2020 Home Medal awarded by the Union Home Ministry for solving crime
Central Medal awarded 2020 Home Medal awarded by the Union Home Ministry for solving crime
Updated on

कोल्हापूर : कोल्हापुरात गृह उपअधीक्षक म्हणून काम केलेल्या आणि सध्या ठाणे पोलिस आयुक्तालयात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या किसन गवळी यांना केंद्रीय पदक प्रदान करण्यात आले.  गुन्ह्याची उकल करण्यासाठी २०२०चे हे पदक केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले. राज्यात केवळ दहा पोलीस अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे. त्यांचे जावई अनिल घेरडीकर यांनाही पदक मिळाले आहे. जावई आणि सासरे यांना एकाच वेळी हे पदक जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.


२०१३ ते १५ दरम्यान उपअधीक्षक गवळी यांनी कोल्हापुरात काम केले आहे. त्यांनी करवीर, शाहूवाडी सह गृह  उपअधीक्षक पदाची धुरा यशस्वी सांभाळली. त्याकाळात त्यांना पोलिस अधीक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांचेही मार्गदर्शन मिळाले होते. सध्याते ठाण्यात कार्यरत असून गुन्ह्याची उकल करण्यातील कौशल्याबाबत त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले. तसेच रायगड येथे  उपअधीक्षक असलेल्या अनिल घेरडीकर यांनाही हे पदक मिळाले आहे. घेरडीकर हे गवळी यांचे जावई आहेत. देशात केवळ २१२ अधिकाऱ्यांना हे पदक मिळाले आहे.


 संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.