मराठा पाठाेपाठ ओबीसींनी आरक्षणाच्या लढ्यासाठी निवडले काेल्हापूर

obc reservation mh
obc reservation mhgoogle
Updated on

कोल्हापूर: ओबीसीचे (OBC reservation)राजकीय आरक्षण रद्द करणे म्हणजे राजकीय प्रतिनिधीत्वावर घाला आहे. याचा निषेध करतो. ४ जुलैला राज्यभर राष्ट्रीय समाज पक्षाकडून चक्का जाम (Chakka Jam agitation) करण्यात येणार आहे. यानिमित्ताने २२ जिल्ह्यांचा दौरा झाला आहे. दरम्यान मराठा पाठाेपाठ ओबीसींनी आरक्षणाच्या लढ्यासाठी आता कोल्हापुरात ४ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती नेते महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (chakka-Jam-for-obc-reservation-statewide-agitation-kolhapur-news)

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्याभरातील कार्यकर्ते या चक्का जाम आंदोलनात सहभागी होतील. आंदोलनानंतर ओबीसी आरक्षणाच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. हे आरक्षण परत मिळावे, त्यासंबंधी कागदपत्रे केंद्र व राज्य सरकारने कोर्टापुढे साजरे करावेत, अशी विनंती पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. या आरक्षणाच्या प्रश्नात केंद्र-राज्य असा संघर्ष, राजकारण न आणता प्रयत्न व्हायला हवेत. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत आगामी निवडणुका घेऊ नये असा पत्र व्यवहार राज्य निवडणूक आयुक्तांना करणार आहे.’’राष्ट्रीय समाज पक्षाचे अजित पाटील, डॉ. संदेश कचरे, सचिन जाधव, उमाजी चव्हाण, विशाल सरगर आदी कार्यकर्त्ये उपस्थित होते.

झेंडा दिल्लीत फडकवणार

राष्ट्रीय समाज पक्षाचे देशात अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाची स्वतंत्र विचारसरणी आहे. आम्ही भाजपचे सहयोगी असलो तरी राज्यात आमची वेगळी ओळख आहे. याच ताकदीवर भविष्यात आमच्या पक्षाचा पंतप्रधान असेल.पक्षाचा झेंडा दिल्लीत फडकेपर्यंत मी लढत राहील,’ असे वक्तव्यदेखील जानकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.