दुकाने चालू की बंद? चेंबरच्या बैठकीत काय झाला निर्णय?

43 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते
दुकाने चालू की बंद? चेंबरच्या बैठकीत काय झाला  निर्णय?
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील (kolhaupr city) सर्व अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची विक्री उद्या 9 जूनला दुपारी 12 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज दुपारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (chambers of commerce industry) बैठकीत घेण्यात आला. 43 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. (chambers of commerce meeting and decisions taken from authority)

व्यापाऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्यामुळे प्रशासनाच्या आणि सरकारच्या लॉकडाऊन (unlocks) धोरणा विरोधात व्यापारांनी आक्रमक भूमिका घेतली. दुकान उघडण्यास परवानगी द्या, अशीही मागणी आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. याची माहिती चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सकाळशी बोलताना दिली.

दुकाने चालू की बंद? चेंबरच्या बैठकीत काय झाला  निर्णय?
कोल्हापूर - हुपरीतील बड्या चांदी उद्योजकाची गोळी झाडून आत्महत्या

संजय शेटे म्हणाले, उद्या 9 जूनला सकाळी दहा ते दुपारी बारा या कालावधीमध्ये सर्व व्यापारी, सर्व व्यवसाय बंद ठेवून आपल्या दुकानासमोर हातात फलक धरून उभे राहतील. सर्वच दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळावी, ही मागणी सरकारपर्यंत पोहचण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामध्ये किराणा भुसारी, किरकोळ किराणा दुकानदार, कंझ्युमर्स असोसिएशन, उत्पादक विक्रेते, ग्रेन मर्चंट असोसिएशन यासह मेडिकल दुकानदार असोसिएशन यांचाही सहभाग असणार आहे. या आंदोलनामुळे उद्या सकाळी सात वाजता उघडणारी दुकाने दुपारी बारा ते चार याच दरम्यान उघडी राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.