चंदगडला हत्तींचे साम्राज्य; मादीवर हक्क सांगण्यासाठी दोन नर भिडणार

गणेश, अण्णात वर्चस्वाची लढाई?
elephant
elephant sakal
Updated on

चंदगड : तालुक्यातील भोगोली, जांबरे परिसरात उच्छाद मांडलेला ‘गणेश’ आणि पिळणी परिसरात वावरणारा ‘अण्णा’ यांच्यात वर्चस्वासाठी लढाई होण्याचे संकेत आहेत. त्यांच्या हालचाली आणि एकूण वर्तनावरून वन विभागाने तर्क मांडला आहे. मादीवर हक्क सांगण्यासाठी त्यांच्यात लढत होते. यात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, असे सांगितले जाते.

elephant
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

२० वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यात पाहुणे म्हणून दाखल झालेल्या हत्तींनी कायमस्वरुपी बस्तान बसवले आहे. चंदगड, दोडामार्ग, आजऱ्यापर्यंतचा टापू काबीज केला आहे. वनपाल दत्ता पाटील यांनी हत्तींचे नामकरण करून त्यांच्याविषयी अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. १५ दिवसांपूर्वी हाजगोळी परिसरात आणि आता जांबरे परिसरात दाखल झालेल्या हत्तीचे नाव ‘गणेश’ असे असून पिळणी परिसरात वावरणाऱ्या हत्तीला ‘अण्णा’ असे संबोधले जाते. आजरा तालुक्यातील चाळोबाच्या परिसरात वावरणाऱ्या हत्तीचे नाव ‘चाळोबा गणेश’ असे ठेवले आहे. मादीला माई व पिल्लांना ‘बारक्या’ व ‘सोंगट्या’ अशी नावे ठेवली आहेत. सध्या गणेश आणि चाळोबा गणेश भोगोली-जांबरेच्या पाच किलोमीटरच्या परिघात वावरत आहेत. वावरणाऱ्या मादी आणि दोन पिल्लांचा कुटुंब प्रमुख म्हणून अण्णाचे स्थान आहे. सध्या विणीचा हंगाम असून मादीने जाणीवपूर्वक अण्णाला बाजूला ठेवल्याची शक्यता आहे. सध्या माई, बारक्या व सोंगट्यासह कोदाळीच्या जंगलात आहे.

elephant
राज्यात कोरोना मृतांचा आलेख वाढला; दिवसभरात १८०६७ नव्या रुग्णांची भर

नराचा त्रास नको म्हणून पिकांचा मोह टाळून ती जंगलातून बाहेर आलेली नाही. त्याचवेळी गणेशने उच्छाद मांडला आहे. अण्णाचे वय ३८ ते ४० असून, गणेश पंचवीशीत आहे. चाळोबा गणेश १७-१८ च्या दरम्यान असून आत्ता तो माजावर येऊ लागला आहे; मात्र तो आजरा तालुक्याची हद्द सोडून अन्यत्र जात नाही. ज्यावेळी ते दोघे समोरासमोर भिडतील.

गणेशवरील ठपका...

गणेश तरुण असून, पाच वर्षांपूर्वी गगनबावड्यापर्यंत फिरून आला आहे. त्या काळात वाकिघोल येथे एका व्यक्तीला ठार केल्याचा त्याच्यावर ठपका आहे. मात्र, त्यानंतर अनेकदा अनेक प्रसंगांत त्याने जाणीवपूर्वक कोणावर हल्ला केलेला नाही. बैलगाड्या, ट्रॅक्टर भिरकावणे, गवताच्या गंज्या विस्कटणे, झाडे मोडणे हे प्रकार तो करीत असला तरी मनुष्यहानी मात्र केलेली नाही.

हत्तींच्या कुटुंबात मातृसत्ताक पद्धती असते. वयोवृद्ध मादीच्या मतावर कुटुंब चालते. त्यांची वर्तणूक माणसांसारखीच दिसून येते. दोन नरांत संघर्ष होऊ शकतो किंवा समेटही घडू शकतो. ते अण्णाच्या वर्तणुकीवर अवलंबून असेल. त्याचवेळी मादी नव्या कुटुंबप्रमुखाला स्वीकारेल की नाही. हे त्या मादीवरच अवलंबून असेल.

- दत्ता पाटील, वनपाल, पाटणे वनपरिक्षेत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.