'आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना कोल्हापुरातून तिकीट द्यावे'

भाजपाने मन मोठे करून यासाठी पुढाकार घ्यावा - हसन मुश्रीफ
hasan mushrif
hasan mushrifsakal
Updated on
Summary

भाजपाने मन मोठे करून यासाठी पुढाकार घ्यावा - हसन मुश्रीफ

कोल्हापूर - काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल आणि त्यांच्या स्वप्नातील कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना आगामी पोटनिवडणुकीत तिकीट द्यावे. ही निवड बिनविरोध करण्यासाठी भाजपाने मन मोठे करून पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. चंद्रकांत जाधव यांच्या शोक सभेत ते बोलत होते.

hasan mushrif
वर्षअखेरीस राजकीय धमाका; नगरपंचायत, बॅंकेच्या निवडणुकीला वेग

यावेळी मुश्रीफ म्हणाले, पोटनिवडणुकीत कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यातून त्यांना खर्‍या अर्थाने सावरायचे झाल्यास आमदार जाधव यांच्या स्वप्नातील कोल्हापूरचा विकास करायचा झाल्यास त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना तिकीट द्यावे. भाजपने अलीकडेच विधानपरिषदेतील काही जागा बिनविरोध केल्या आहेत. मनाचा मोठेपणाही भाजपने आताही दाखवावा. दरम्यान माजी महापौर निलोफर आजरेकर यांनीही जाधव कुटुंबियातील सदस्यांना काँग्रेसचे तिकीट घ्यावे अशी मागणी केली.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, सर्व गोष्टींची जाण असणारा नेता आपल्यातून निघून गेला हे दुर्दैवी असून त्यांना अपेक्षित असलेले उद्योग केंद्र उभारण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया. कमी कालावधीमध्ये सर्व विषयांचा अभ्यास असणारा माणूस आपल्यातून निघून गेला आहे, त्यामुळे त्यांच्या मनातील विकासासाठी प्रयत्नशील राहूया. त्यांच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दीवरून त्यांचे मोठेपण दिसून येते. आमदार जाधव यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. यातून त्यांना सावरण्याचा प्रयत्न करूया, असे ते म्हणाले. यावेळी खासदार संजय मंडलिक, प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, सुजित मिंचेकर, राजूबाबा आवळे उपस्थित होते.

hasan mushrif
चालकांनो सावधान! कायदे मोडणे पडणार महागात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()