'जयश्रीताई मी तुमच्या घरी दोनदा आलो', कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांचा दावा

Chandrakant Patil in Kolhapur
Chandrakant Patil in Kolhapur
Updated on

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. कोल्हापुरातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अनेक नावांच्या चर्चांनंतर अखेर भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. (Chandrakant Patil in Kolhpaur)

त्यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात पोहोचले आहेत. (Kolhpaur North Assembly Bypolls)

खरंतरं, महेश जाधव यांचं नाव चर्चेत असताना भाजपने हे कार्ड खेळलं. यावेळी यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप होत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना बंटी पाटील हा माणूस खाणारा नेता आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant Patil in Kolhapur
'उमेदवार पाडण्यासाठी चंद्रकांतदादांनी शिवसेनेच्या पाठीत खंजिर खुपसला'

'अपघाताने तुमचे पती काँग्रेसच्या तिकीटावर'

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढणाऱ्या जयश्री पाटील यांच्यावरही निशाणा साधला. जयश्री जाधव यांनी भाजपच्या तिकिटावर लढावं, अशी भाजपची मागणी होती. मात्र, तसं न झाल्याने चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.

अपघाताने तुमचे पती काँग्रेसच्या तिकीटावर लढले. मात्र, या जागेवर पाच वेळा शिवसेना निवडून आली होती. काँग्रेस फक्त दोन वेळाच जिंकली. आता नाराज शिवसैनिक योग्य जागा दाखवेल, असं पाटील म्हणाले. जयश्रीताई मी तुमच्या घरी दोनदा येऊन गेलो, अशी आठवण चंद्रकांत पाटलांनी यावेळी करून दिली.

तुम्ही ज्या पक्षाचे आहात, त्याचे नेते कुठे आहेत ते शोधावं लागतं. सेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. अस्वस्थ झाल्याने निवडणुकांमध्ये त्यांचा रोष बाहेर निघणारच आहे. यावर संजय राऊत म्हणतील, आमच्या घरातलं आम्ही बघतो. पण तुमच्या घरात काय चाललंय ते दररोज दिसतंय. सकाळ संध्याकाळ टीव्ही लावल्यानंतर कळतंय सगळं, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.